आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलिकांचे नवीन आरोप:समीर वानखेडेंनी आर्यन खानला अटक नाही तर सरळ अपहरण करून खंडणी मागितली, SIT सत्य समोर आणणार! नवाब मलिकांचे नवे आरोप

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर रोज नवीन आरोप करून त्यांना अडचणीत आणणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आता अपहरणाचा आरोप केला आहे. समीर वानखेडे यांनी आर्यन खानला अटक नाही तर प्रत्यक्षात अपहरणच केले होते. तसेच सुटका करण्यासाठी ते खंडणी मागत होते असे नवाब मलिक म्हणाले आहेत.

मलिक यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यात त्यांनी NCB वर आर्यनच्या अपहरणाचे आरोप केले आहेत. आर्यन खानच्या अपहरण आणि खंडणी प्रकरणात मीच समीर दाऊद वानखेडे यांच्या SIT मार्फत चौकशीची मागणी केली होती. आता केंद्रीय आणि राज्य स्तरीय अशा दोन-दोन SIT त्याचा तपास करत आहेत. वानखेडे यांचे रहस्य कोण समोरक आणणार आणि त्यांचा भांडाफोड करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

तत्पूर्वी शुक्रवारी NCB ने आर्यन खान ड्रग्स प्रकरणासह 6 प्रकरणांचा तपास उप-महासंचालक (ऑपरेशन्स) संजय सिंह यांच्या हाती सोपविला. आता या प्रकरणात समीर वानखेडे संजय सिंह यांना रिपोर्ट करतील. यापूर्वी वानखेडेंना दिल्लीला पाठवले जात असल्याचे वृत्त आले होते. पण, समीर वानखेडे यांनी वृत्त झुगारून लावले. तसेच आपण अजुनही या केसमध्ये सहकार्य करणार असल्याचे ते म्हणाले.

या 6 प्रकरणांमध्ये सिंह यांना सहकार्य करणार समीर वानखेडे

  1. क्रूज ड्रग्स केस (आर्यन खान प्रकरण)
  2. समीर खान केस (नवाब मलिक यांचे जावई)
  3. अभिनेता अरमान कोहली ड्रग्स प्रकरण
  4. मुंब्रा एमडी ड्रग्स प्रकरण
  5. जोगेश्वरी 1 किलो चरस प्रकरण
  6. डोंगरी एमडी ड्रग्स प्रकरण
बातम्या आणखी आहेत...