आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वानखेडेंच्या जातीवरुन वाद:समीर वानखेडेंनी दिल्लीमध्ये SC आयोगात कास्ट सर्टिफिकेट केले सादर, आयोगाने महाराष्ट्र सरकारकडून मागितला रिपोर्ट

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मलिकांचा आरोप- नोकरीसाठी खोटे कास्ट सर्टिफिकेट बनवले

महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सोमवारी दिल्ली गाठली. त्यांनी अनुसूचित जाती आयोगाकडे (NCSC) पोहोचून त्यांच्या जातीशी संबंधित कागदपत्रे सादर केली. त्यांनी आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांचीही भेट घेतली. मलिक यांनी वानखेडे यांच्यावर मुस्लिम असल्याचा आरोप करत आपली जात लपवल्याचा आरोप केला होते.

यापूर्वी समीर वानखेडे यांनी शनिवारी एनसीएससीचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली होती. रविवारी हलदर यांनी समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांची त्यांच्या घरी भेट घेतली होती. यावर प्रश्न उपस्थित करत मलिक यांनी हलदर यांच्याबाबत राष्ट्रपतींकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले होते.

मलिकांचा आरोप- नोकरीसाठी खोटे कास्ट सर्टिफिकेट बनवले
नोकरी मिळवण्यासाठी वानखेडे यांनी मुस्लिम असूनही दलिताचे खोटे जात प्रमाणपत्र तयार केल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. दरम्यान, आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर वानखेडे यांनी डीडीजी एनसीबीची भेट घेण्यासाठी दिल्लीतील कार्यालय गाठले. वानखेडे यांच्यावरील 25 कोटींच्या लाचखोरीच्या आरोपाची चौकशी एनसीबीची दक्षता शाखा करत आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल याने आरोप केला आहे की, याच प्रकरणातील आणखी एक साक्षीदार केपी गोसावी याने समीर वानखेडेंच्या सांगण्यावरुन आर्यनला सोडण्याच्या बदल्यात शाहरुख खानकडे 25 कोटींची लाच मागितली होती.

महाराष्ट्र सरकारकडून सात दिवसांत चौकशी अहवाल मागवला आहेः सांपला
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला आजच्या बैठकीत म्हणाले, 'आज एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे मला भेटायला आले होते. त्यांनी 29 ऑक्टोबर रोजी तक्रार देखील दाखल केली होती, ज्याच्या आधारावर आम्ही महाराष्ट्राचे गृह सचिव आणि इतर अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे आणि 7 दिवसांत उत्तर मागितले आहे. आज त्यांनी आम्हाला त्यांचा धर्म आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित सर्व कागदपत्रे दिली आहेत. आम्ही ते महाराष्ट्र सरकारकडे पाठवले असून ही सर्व कागदपत्रे योग्य असल्याचे आढळल्यास त्यांनी काळजी करू नये. समीर वानखेडे यांनी सांगितले की, ते अनुसूचित जातीतून येतात. त्यांनी आयोगाला संबंधित सर्व कागदपत्रे दिली आहेत.

रविवारी अरुण हलदर यांनी समीर यांच्या वडिलांना आश्वासन दिले की, त्यांच्या कुटुंबाला आता अजून त्रास दिला जाणार नाही. एनसीएससीच्या व्हिसी यांनी या प्रकरणाच्या चौकशीनंतर कारवाई केली जाईल, असे सांगितले होते. यादरम्यान हलदर म्हणाले होते, 'कोणताही अधिकारी आयोगासमोर बनावट प्रमाणपत्रे ठेवू शकतो का? आमच्याकडे कोणताही अनुभव नाही का? माझ्या अनुभवानुसार, ते (समीर वानखेडे) बनावट प्रमाणपत्रे सादर करू शकत नाही, कारण यामुळे त्यांची नोकरीही जाईल.' ते पुढे म्हणाले की, आम्ही महाराष्ट्र सरकारला या संपूर्ण प्रकरणाचा सात दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...