आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Nilofe Maluk | Tweet | Sameer Wankhede | Wedding | Sameer Wankhede's Wedding Magazine, Father's Name Dawood, Nawab Malik's Daughter Posted A Wedding Magazine; Big Revelation About Father's Name

निलोफर मलिक-खान यांचे ट्विट:समीर वानखेडेंच्या लग्न पत्रिकेत वडिलांचे नाव दाऊद, नवाब मलिकांच्या मुलीने वानखेडेंची लग्नपत्रिकाच केली पोस्ट

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समीर वानखेडे विरूद्ध नवाब मलिक यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे. यात आता मलिकांच्या मुलीनेही सहभाग घेतल्याचे दिसत आहे. नवाब मलिकांची मुलगी निलोफर हिने समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाची पत्रिका ट्विटवर शेअर केली आहे. या पत्रिकेत समीर वानखेडे यांच्या पूर्ण नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्या पत्रिकेत समीर दाऊद वानखेडे असे लिहिण्यात आले आहे.

पत्रिका शेअर करत निलोफर म्हणाली की, समीर वानखेडे यांचा निकाह 7 डिसेंबर 2006 ला लोखंडवाला कॉम्प्लेक्स या ठिकाणी शबाना कुरेशींसोबत झाला. या विवाहाची जी लग्न पत्रिका आहे त्यामध्ये समीर दाऊद वानखेडे असे नाव लिहिण्यात आले आहे. असे पत्रिका ट्विट करत नीलोफर मलिक-खानने म्हटले आहे. समीर वानखेडे हे दाऊद आणि जहिदा वानखेडे यांचे सुपुत्र असल्याचा उल्लेख या पत्रिकेत आहे.

सना मलिक यांनी काय म्हटलं आहे?
नवाब मलिकांची दुसरी मुलगी सनाने समीर वानखेडे यांचेस मॅरेज सर्टिफिकेट ट्विट केले आहे. त्यामध्ये यास्मीन अझीज खान, निखिल छेडा आणि ग्लेन पटेल हे साक्षीदार असल्याचे म्हटले आहे. जी पत्रिका ट्विट करण्यात आली ती पहिल्या पत्नीच्या कुटुंबीयांनी छापली आहे. त्यांनी काय छापले होते ते आम्हाला माहित नाही असे वानखेडेंतर्फे सांगण्यात आले आहे.

आर्यन खान प्रकरणावरून वाद सुरू
मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने छापा मारत आर्यन खानसह आणखी आठ जणांना 2 ऑक्टोबर रोजी अटक केली होती. त्यांनंतर मलिकांनी 6 ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेत एनसीबीने केलेली कारवाई बोगस असल्याचे म्हटले होते. आर्यन खानच्या चौकशीदरम्यान त्याकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज आढळून आले नव्हते. त्यानंतर जवळपास रोज नवाब मलिक पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडेंवर विविध आरोप लावत आहेत.

बातम्या आणखी आहेत...