आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणारे सीसीटीव्हीत कैद:पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात, तपासासाठी विशेष पथकाची स्थापना

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्लाप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईच्या भांडूप भागातून या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे मला मारहाण करताना हल्लेखोरांनी ठाकरे व वरुण सरदेसाईंचे नाव घेतले, असे फिर्यादीत संदीप देशपांडे यांनी सांगितले आहे.

सीसीटीव्ही फुटेज आले समोर

सीसीटीव्हीत कैद झालेला हल्लेखोर.
सीसीटीव्हीत कैद झालेला हल्लेखोर.

हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. यातून दोन हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी लावला आहे. संदीप देशपांडे यांच्यावर काल सकाळी शिवाजी पार्क येथे हल्ला झाला होता. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दोन जणांना अटक केली आहे. तसेच, तपासासाठी विशेष पथकाची देखील स्थापना करण्यात आली आहे.

हल्लेखोरांनी ठाकरे, वरुण सरदेसाईंचे नाव घेतले

हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरची कॉपीही समोर आली आहे. मारहाण करताना हल्लेखोरांनी ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांच्या नावाचा उल्लेख केल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. आज संदीप देशपांडे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यात ते कोणता गौप्यस्फोट करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

फिर्यादीमध्ये संदीप देशपांडेंनी काय म्हटले आहे?

एफआयआरमध्ये संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे की, मी शुक्रवारी सकाळी 6.45 वाजता शिवाजी पार्क मैदानात मॉर्निंग वॉकसाठी गेलो होतो. मैदानाचा एक राऊंड पुर्ण करून गेट नं. 5 कडे आलो. त्यावेळी अंदाजे 7.15 वाजले असतील. गेट नं. 5 पास करून थोडा पुढे गेलो असताना कुणीतरी मागून माझ्या उजव्या पायाचे मांडीवर कोणत्यातरी टणक वस्तुने जोरात फटका मारला. म्हणुन मी लगेच मागे वळून पाहिले असता तीन, चार तरूण होते. त्यांच्या हातात लाकडी स्टंप व बॅट होते. त्यांनी मला हातातील स्टंप व बॅटने मारहाण केली. त्यांच्यापैकी एकजण माझ्या डोक्यावर बॅट मारत असताना मी हात मधी धरले त्यामुळे मी वाचलो, परंतु हातावर जोरात प्रहार झाला व मी खाली पडलो. मी पडल्यावरही त्यांनी मला स्टंप व बॅटने मारहाण केली. मारहाण करताना ते मला "तुझे खुप झाले, पत्र लिहीतोस का ----? ठाकरेंना नडतोस का? वरूणला नडतोस का?" असे बोलले. ते लोक मारहाण करून राजा बडे चौकाच्या दिशेने पळत गेले. मारहाणीमध्ये माझा उजवा हात फ्रॅक्चर झाला असल्याचे डॉक्टरांनी मला सांगितले. माझे डाव्या पायाला गुडघ्याच्या खाली दुखापत झाली असुन, उजव्या पायावर व इतरत्र मुका मार लागला आहे.

संदीप देशपांडे यांनी दिलेली फिर्याद.
संदीप देशपांडे यांनी दिलेली फिर्याद.

संबंधित वृत्त

1) मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला:राज ठाकरेंनी घेतली भेट, डिस्चार्जनंतर म्हणाले- असल्या हल्ल्यांना भीक घालत नाही!

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. शिवाजी पार्कवरील मैदानात ते सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना हा हल्ला झाला. त्यांना हिंदुजा रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. आता त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे, अमित ठाकरे, भाजप आमदार नितेश राणे संदीप देशपांडे यांच्या भेटीसाठी हिंदुजा रुग्णालयात गेले. सदा सरवणकर यांच्याकडूनही त्यांच्या प्रकृतीची भेट देऊन विचारपूस करण्यात आली. वाचा सविस्तर

2) अमेय खोपकरांचा थेट आरोप:संदीप देशपांडे यांच्या हल्ल्याप्रकरणी संजय राऊत- आदित्य ठाकरेंची चौकशी करा

3) संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी आशिष शेलार यांचा आरोप:म्हणाले-मलाही गोळ्या झाडून मारण्याची धमकी, पोलिसांनी समान धागा शोधावा

बातम्या आणखी आहेत...