आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. शिवाजी पार्कवरील मैदानात ते सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना हा हल्ला झाला. त्यांना हिंदुजा रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. आता त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे, अमित ठाकरे, भाजप आमदार नितेश राणे संदीप देशपांडे यांच्या भेटीसाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल झाले आहेत. सदा सरवणकर यांच्याकडूनही त्यांच्या प्रकृतीची भेट देऊन विचारपूस करण्यात आली.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर संदीप देशपांडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. संदीप देशपांडे म्हणाले, आम्ही कोणाला भीक घालत नाही. यापाठिमागे कोण आहेत, हे मला माहित आहे. आम्ही त्यांना घाबरणारे नाही.
संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केलेले हल्लेखोर चेहऱ्याला मास्क लावू आलेले होते. हल्ला करून हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यात देशपांडे जखमी झाले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणांवरुन झाला याबाबत पोलिस तपासातच अधिक माहिती समोर येईल.
कशी झाली घटना?
संदीप देशपांडे हे आज नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला शिवाजी पार्क येथे गेले होते. यावेळी मॉर्निंग वॉक करत असतानाच अचानक काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना रॉड आणि स्टम्पने बेदम मारहाण करण्यात आली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संदीप देशपांडे प्रतिकार करू शकले नाही. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे देशपांडे जखमी होऊन खाली कोसळले.
हल्ला होत असताना शिवाजी पार्क मैदानात मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांनी देशपांडे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोर पसार झाले. त्यानंत स्थानिकांनी तात्काळ देशपांडे यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात केले. देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी पसरताच मनसेचे नेते, पदाधिकारी आणी कार्यकर्ते हिंदुजा रुग्णालयात पोहोचत आहे.
पूर्वनियोजित कट?
संदीप देशपांडे यांना कोणतेही संरक्षण नाही. याआधी त्यांना पोलिस संरक्षण देण्यात आले होते. पण त्यांनी ते नाकारले होते. आजचा हल्ला पूर्वनियोजित कट तर नव्हे ना अशाही शंका उपस्थित केल्या जात आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.