आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंदीप देशपांडे यांच्या हल्ल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची चौकशी करावी असा थेट आरोप मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी केला आहे. मुंबई पोलिसांनी दोघांचीही चौकशी करावी व जर त्यात तथ्य निघाले तर त्यांना अटक करावी असा आक्रमक पवित्रा खोपकर यांनी घेतला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस यांच्यावर आज मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉक दरम्यान हल्ला झाला आहे.या दरम्यान मनसेचे अमेय खोपकर यांनी खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर दोषारोप केले.
काय म्हणाले खोपकर?
अमेय खोपकर म्हणाले, माझी पोलिसांना नम्र विनंती आहे की राज्यातील गुंड संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावे, यांची चौकशी करावी. कारण संदीप देशपांडे सातत्याने मुंबई महापालिकेचे भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्र विनंती आहे की आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची चौकशी करावी आणि जर काही तथ्य निघाले तर त्यांना अटक करावी. संदीप देशपांडे गप्प बसणारा माणूस नाही. मुंबई पोलीस आणि प्रशासनाने संदीप देशपांडे यांना योग्य ती सुरक्षा पुरवावी. आजच्या भ्याड हल्ल्याचे उत्तर नक्की मिळेल. पाठीमागून हल्ले करायचे नाहीत. मर्द असाल तर पुढे या. संदीप देशपांडे सतत मुंबई महापालिकेचे भ्रष्टाचार बाहेर काढत असेल आणि त्यांच्यावर हल्ले होत असतील तर आम्ही गप्प बसायचे का?" असेही ते म्हणाले.
कसा झाला हल्ला?
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर चालण्यास गेले असताना चार अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. क्रिकेट खेळतानाच्या स्टम्पने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या चारही इसमांनी आपला चेहरा कपड्याने झाकला होता. हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. संदीप देशपांडे यांना हल्ल्यात दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवाजी पार्क पोलिस घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करण्यात आला. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
संबंधित वृत्त
संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी आशिष शेलार यांचा आरोप:म्हणाले-मलाही गोळ्या झाडून मारण्याची धमकी, पोलिसांनी समान धागा शोधावा
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. मलाही गोळ्या झाडून मारण्याच्या धमक्या याआधी आलेल्या आहेत. पोलिसांनी यातील समान धागा शोधून काढावा, असा गौप्यस्फोट भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.