आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संदीप देशपांडेंचा शिवसेनेवर हल्लाबोल:हाणामाऱ्या करायला हा काय बिहार आहे का?; शिवसेनेने जे पेरलय तेच उगवतय

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दादर, माहिम, प्रभादेवी हा एक सुसंस्कृत मतदारसंघ आहे. अशा पद्धतीच्या हाणामाऱ्या करायला हा काही बिहार नाही. पोलिसांनी योग्य ती चौकशी करावी. आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. शिवसेनेने अडिच वर्षात जे पेरलय तेच आता उगवतय. अशाप्रकारचा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला लगावला आहे.

पुढे शिवसेनेवर निशाणा साधतांना ते म्हणाले, लोकांवर त्यांनी खोट्या केसेस दाखल केल्या. मनसे आंदोलनाच्यावेळी माझ्यावर आणि संतोषवर पोलिस भगिनीला धक्का मारल्याचा खोटा आरोप करून केस दाखल करण्यात आली होती. त्या महिला कॉन्स्टेबल आता आहे कुठे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नेमके काय आहे प्रकरण?

गणपती विसर्जनाच्या निमित्ताने प्रभादेवी परिसरात शिवसेना आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर दादर-प्रभादेवी परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले. शनिवारी शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांनी 'आवाज करणार तर ठोकणारच. आज पेंग्विन सेनेला स्वतःची लायकी समजलीच असेल' अशी पोस्ट फेसबुकवर टाकली होती. त्यानंतर शिवसैनिकांनी संतोषला मारहाण केली.

तुम्हाला सत्तेचा माज होता

या सर्व प्रकरणावर मनसे नेते संदीप देशपांडे बोलले आहेत. ते म्हणाले, त्यामुळे आता जे पेरलय ते उगवेल. तुम्हाला सत्तेचा माज होता. आमच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या. कोरोना काळात लोकांचे हाल सुरु असताना त्यांच्यावर पोलिसी कारवाई करण्यात आली. मात्र अशाप्रकारच्या हाणामाऱ्या चुकीच्या आहेत. याची पोलिसांनी दक्षता घ्यावी. असेही त्यांनी स्पष्ट केले.

वारसा वास्तूंचा नसुन विचारांचा

यावेळी देशपांडे म्हणाले, वारसा हा वास्तूचा नसुन विचारांचा असतो. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा हा केवळ राजसाहेबांकडे आहे. मराठी माणसाचे, हिंदुत्वाचे विचार राज ठाकरेच ताकदीने मांडत आहेत. शिवसेना पवार साहेबांच्या मांडीवर बसून मांडे खात आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार जर कोणी आत्मसात केले असतील तर ते राज ठाकरेंनीच केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...