आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कोठडी सुनावली:संदीप देशपांडे हल्ला; दोन आरोपींना अटक

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ल्यामागे “भांडूप कनेक्शन’ समोर आले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे, तर दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ज्या दोघांना अटक करण्यात आली आहे, त्यांना भांडूप परिसरातून ताब्यात घेण्यात आले होते. या अटकेवर प्रतिक्रिया देताना देशपांडे म्हणाले की, शिवाजी पार्कवर क्रिकेट (हल्ला) खेळण्यासाठी आलेले “क्रिकेटर’ (हल्लेखोर) आणि त्यांचे कोच (मास्टरमाइंड) कोण याची माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे सरकारने आता त्यांच्या सुरक्षेची काळजी करायला हवी. मला पोलिस संरक्षणाची गरज नाही.

मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे की, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक ५६ वर्षीय आरोपी महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेनेचा उपाध्यक्ष आहे. हाच मनसे नेता देशपांडे हल्ला प्रकरणाचा मास्टरमाइंड आहे. त्याच्या हल्ल्यामागचा हेतू पोलिस शोधत आहेत. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना स्थानिक न्यायालयाने ९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अशोक शंकर खरात (५६) आणि किसन पुरुषोत्तम सोळंकी (३६) अशी या दोन आरोपींची नावे आहेत.

बातम्या आणखी आहेत...