आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीका:40 वर्ष शिंदे चालले आत्ताच का वावडे?, तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटत आहात; शिवसेनेच्या आमदाराने उद्धव ठाकरेंना सुनावले

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकनाथ शिंदे यांनी तुम्ही त्यांना गुंड म्हणत आहात. तर हा गुंड तुम्हाला 40 वर्षे चालला आणि आत्ताच त्याचे वावडे तुम्हाला का उठले आहे? असा थेट सवाल शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. तसेच तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटायचे धंदे चालू केले आहेत, असा टोला यावेळी त्यांनी ठाकरेंना लगावला.

महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजीनगर येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काडतूस तर मुख्यमंत्री शिंदेंचा गुंड असा उल्लेख केला. यावरुन आता राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना-भाजप आमदारांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी देखील उद्धव ठाकरे यांना चांगलेच धारेवर धरले आहे.

कुठली भाषा तुम्ही वापरता?

आमदार संजय गायकवाड म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी 40-45 वर्षे बाळासाहेब ठाकरेंची सेवा केली. आणि आता तुम्ही त्यांना गुंड म्हणत आहात. तर हा गुंड तुम्हाला 40 वर्षे चालला आणि आत्ताच त्याचे वावडे तुम्हाला का उठले आहे. मागील सहा महिन्यात तुम्हाला ते लगेच गुंड का वाटू लागले, कुठली भाषा तुम्ही वापरता? अशा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

शिंदे सच्चे शिवसैनिक

संजय गायकवाड पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे हे सच्चे शिवसैनिक आहेत. त्यांच्यासोबत ज्या चाळीस आमदारांनी बंडखोरी केली. ती फक्त बाळासाहेबांच्या विचारासाठी केली. मात्र तुम्ही आता काय करता तुम्ही तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटायचे धंदे चालू केले आहेत, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

राऊतांना इशारा

यावेळी संजय गायकवाड यांनी संजय राऊतांना थेट आव्हान दिले. ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून तुम्ही करत असलेल्या वायफळ बडबडीला लोक कंटाळले आहेत तुम्ही आता तुमचा थोडा बंदोबस्त बाजूला ठेवा, आणि मग बघा आमचे कार्यकर्ते काय करतात, असा थेट इशारा दिला.