आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खरंच राजीनामा दिला?:वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे वृत्त; पण, राठोड यांचे जवळिक म्हणतात- राजीनामा दिलाच नाही

मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय राठोड यांच्या जवळच्या व्यक्तींनी राजीनाम्याचे वृत्त अफवा असल्याचे सांगितले

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सतत एका मंत्र्याचे नाव चर्चेत असताना महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वनमंत्री संजय राठोड यांनी आपला राजीनामा मंगळवारी मातोश्रीवर पाठवला असून तो मुख्यमंत्र्यांनी मान्य केला आहे. हा राजीनामा त्यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी दिला की इतर काही कारणासाठी हे अद्याप स्पष्ट नाही. यासोबतच, राठोड यांच्या एका जवळच्या व्यक्तीने राजीनाम्याचे वृत्त फेटाळले आहे. सोबतच, ही एक अफवा असल्याचाही दावा केला.

मूळची परळी येथील रहिवासी राहिलेली 22 वर्षीय टिक-टॉक स्टार पूजा चव्हाण हिने पुण्यात आत्महत्या केली. आपल्या भावासोबत स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी गेलेली पूजा हिने गेल्या रविवारी मध्यरात्री तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. रुग्णालयात नेले जात असतानाच तिचा मृत्यू झाला. यानंतर विदर्भातील एका मंत्र्याच्या ती संपर्कात असल्याचे सांगितले जात होते. सोशल मीडियावर या प्रकरणाची खूप चर्चा झाली. पण, पोलिसांनी त्यास अधिकृत दुजोरा दिला नाही. याच दरम्यान पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्याच्या ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाल्या. पण, पोलिसांनी किंवा तिच्या कुटुंबियांनी या ऑडिओ क्लिप आत्महत्या प्रकरणाशी संबंधित असल्याचे अद्याप सांगितलेले नाही.

आतापर्यंत पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजप आणि विरोधकांनी महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला. पण, राज्य सरकारमधील कुठल्याही मंत्र्याने जाहीर प्रतिक्रिया देणे टाळले. राजीनाम्याचे वृत्त खरे ठरल्यास काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये वादामुळे मंत्र्याने राजीनामा दिल्याची ही पहिलीच वेळ ठरेल.

बातम्या आणखी आहेत...