आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्हालाच जास्त माहिती असेल!:संजय राउत म्हणाले- संजय राठोड हे शिवसेनेचे प्रमुख मंत्री आहेत, शिवसेनेचा चेहरा आहेत; राजीनामा दिला की नाही हे मला माहिती नाही

मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या वृत्तावर संजय राउत यांची पहिली प्रतिक्रिया

शिवसेना नेते तसेच वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या वृत्तावर शिवसेना नेते संजय राउत यांनी स्पष्ट बोलणे टाळले आहे. राउत यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांना संजय राठोड यांच्या राजीनाम्याची काहीच माहिती नाही. त्यांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवला किंवा नाही हे मीडियालाच माहिती अशा शब्दांत राउत यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

राउत म्हणाले, "हा विषय सरकारचा आहे आणि सरकारचे प्रमुख लोक त्यासंबंधात त्यांचं मत व्यक्त करतील किंवा निर्णय घेतील. तसेच संजय राठोड हे शिवसेनेचे प्रमुख मंत्री आहेत, शिवसेनेचा चेहरा आहेत. त्यांच्यावर जे आरोप केले जात आहेत, त्याप्रकरणी पोलीस तपासाचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यासंबंधीची माहिती मुख्यमंत्री घेतील. दरम्यान माध्यमांच्या प्रतिनिधींनी राऊत यांना संजय राठोडांच्या राजीनाम्याविषयी विचारले असता संजय राऊत म्हणाले की, राजीनामा दिला की नाही हे मला माहिती नाही, तुम्हाला याची जास्त माहिती असेल."

उल्लेखनीय बाब म्हणजे, आजच शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची मातोश्रीवर बैठक आहे. या बैठकीत शिवसेनेचे प्रमुख नेते आणि मंत्री उपस्थिती लावणार आहे. परंतु, या बैठकीत संजय राठोड सामिल होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुळातच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण पेटले असताना मंत्र्याचा राजीनामा आल्याने ही बैठकच होणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...