आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sanjay Raut | Amravati Voilance | In Order To Prevent Incidents Like Amravati, Opposition Leaders Should Try To Calm The Situation Without Adding Fuel To The Fire: MP Sanjay Raut

अमरावती हिंसाचार:अमरावतीसारख्या घटना होऊ नयेत म्हणून, विरोधी पक्षनेत्यांनी आगीत तेल न टाकता, ते शांत करण्यासाठी प्रयत्न करावे- खासदार संजय राउत

मुंबई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीतील वातावरण निवळलेले असताना पुन्हा आगीत तेल ओतू नये, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राउत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. रझा अकादमीवर बंदी घालण्यासंदर्भात राज्य सरकार, गृहखाते निर्णय घेईल असेही संजय राउत म्हणाले आहेत.

"कायदेशीर कारवाई करताना गट, तट, पक्ष पाहिला जात नाही. एकेकाळी विरोधी पक्षनेतेही राज्याचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात अमरावतीसारख्या घटना घडू नयेत, यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी आगीत तेल न टाकता, ते शांत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

अमरावतीसारख्या घटनांचे राजकारण, पेटवापेटवी ही महाराष्ट्राला परवडणारी नाही. महाराष्ट्र हा दंगलींसाठी ओळखला जाऊ नये. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. आपण पाहिले असेल त्याच अमरावतीच्या बाजूला पुढे विदर्भात, गडचिरोलीत, याच पोलिसांनी, याच सरकारने 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. कायद्यापुढे सगळे समान आहेत.

अमरावतीत दंगल कोणी पेटवली? कोणत्या कारणाने पेटवली? हे देशालाही माहिती आहे, राज्याच्या गृहमंत्र्यांनाही माहीत आहे आणि अमरावतीच्या जनतेलाही माहित आहे. वातावरण सगळे शांत झाले असताना, उगाचेच काड्या करणारे काम कोणीही करू नये, एवढेच मी त्यांना आमच्या पक्षातर्फे आणि महाविकास आघाडीतर्फे आवाहन करेल. असे संजय राउत म्हणाले.

भाजप अमरावतीच्या बाबतीत आक्रमक असल्याचे पाहायला मिळते असे प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर संजय राउत म्हणाले की, ते आक्रमक आहेत, म्हणजे, त्यांना काय परत दंगल करायची आहे का? "कशाकरता आंदोलन करत आहेत, काय आहे? महागाई विरोधात आंदोलन करतायत? की, चीन लडाखमध्ये घुसल्यामुळे आंदोलन करत आहेत. कशासाठी आंदोलन करत आहेत, त्यांनी सांगावे. असेही संजय राउत म्हणाले.

हिंमत असेल तर रझा अकादमीवर बंदी घाला, असे भाजपच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्याबाबत बोलताना संजय राउत म्हणाले की, "तुम्ही का नाही घातली बंदी? तुमच्या काळातही काही प्रकार घडले होते. राज्य सरकार कायद्याच्या संदर्भात कुठेही नमते घेत नाही. काय करायचे आहे? ते गृहमंत्री पाहण्यास सक्षम आहेत."

पुढे बोलताना ते म्हणाले की, "भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर गुन्हे दाखल होणे, म्हणजे, हिंदूंवर गुन्हे दाखल होत आहेत, असे म्हणणे चुकीचे आहे. जे दंगलखोर आहेत. ज्यांनी अमरावती पेटवली. ज्यांनी जनतेचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले, ते कुणीही असू द्या. ते एकाच पक्षाचे आहेत, म्हणजे, ते हिंदू किंवा मुस्लिम आहेत, असे होत नाही." अशी प्रतिक्रिया संजय राउतांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...