आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संजय राऊत:काही दिवसांपूर्वी टीका, आता घेतली भेट; म्हणाले - राज्यपाल आमचे मार्गदर्शक

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ...म्हणून वाकून नमस्कार केला : संजय राऊत
  • सोनिया माता, साहेब काका, कोश्यारी पिता; भाजपची टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून राजभवन हे राजकारणाचा अड्डा होऊ नये, रामलाल नावाच्या राज्यपालांची आठवण झाली, अशी वक्तव्ये करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर बोचरी टीका करणारे शिवसेना खासदार प्रवक्ते संजय राऊत यांनी शनिवारी राजभवन येथे जाऊन राज्यपालांची भेट घेतली. तासभर झालेल्या या भेटीनंतर सदिच्छा भेट घेतली असून राज्यपाल आमचे मार्गदर्शक आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून राज्यपालांवर टीका करण्याची एकही संधी संजय राऊत वा महाविकास आघाडीच्या अन्य नेत्यांनी सोडली नव्हती. खरे तर राज्यपालांनीच दिलेल्या सल्ल्यानुसार निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्यासाठी महाविकास आघाडीने पत्रे दिली आणि राज्यपालांनीही पत्र दिल्याने तातडीने निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या होत्या. महाविकास आघाडीचे नेते खासगीत ही बाब मान्य करतात. गेल्याच आठवड्यात राज्यपालांनी एका अभिनेत्रीला हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिल्याची खोटी बातमी पसरवण्यात आली होती. शुक्रवारी राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून विद्यापीठाच्या निवडणुका त्वरित घेण्यात याव्यात, असे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांची राज्यपाल भेट महत्त्वाची मानली जात आहे.

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, राज्यपालांशी माझे फार पूर्वीपासून चांगले संबध आहेत. खूप दिवस त्यांना भेटण्याचा विचार करीत होतो. परंतु योग जुळून येत नव्हता. आजची भेट ही सदिच्छा भेट होती, असेही राऊत या वेळी बोलताना सांगितले.

म्हणून वाकून नमस्कार केला : संजय राऊत

संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांना वाकून नमस्कार केल्याचे छायाचित्र व्हायरल होताच यावर प्रतिक्रिया देताना राज्यपाल कोश्यारी हे माझ्यापेक्षा ज्येष्ठ असल्यानेच मी त्यांना वाकून नमस्कार केला. आम्हा दोघांमध्ये चांगली चर्चा झाली, असेही राऊत यांनी या वेळी सांगितले.

सोनिया माता, साहेब काका, कोश्यारी पिता : भाजप

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध अतिशय चांगले असून ते पिता-पुत्राप्रमाणे आहेत, ते तसेच राहावेत. आमच्यात दऱ्या वगैरे पडत नाहीत. सरकार काय करत आहे, त्याची संपूर्ण माहिती राज्यपालांना आहे. विरोधकांनी राज्यपालांशी चर्चा करण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांशी बोलावयास हवे. भाजपने राऊतांच्या वक्तव्यावर सोनिया माता, साहेब काका आणि आता कोश्यारी पिता या शब्दांत, सरडा रंग बदलतो म्हणतात. पण करीमलाला फॅन ऊर्फ धृतराष्ट्राचे संजय ऊर्फ कार्यकारी ऊर्फ तिघाडीचे चाणक्य म्हणजे आपले राऊत यांनी आपला नवा पिता जाहीर केला आहे, अशी टीका केली.

बातम्या आणखी आहेत...