आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमय्या अडचणीत?:युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून किरीट सोमय्यांनी घोटाळा केला; खासदार संजय राऊत यांचा आरोप

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना आणि सोमय्या यांच्यातील वाद गेल्या अनेक दिवसांपासून राज्याभरात चर्चेचा विषय ठरला आहे.सोमय्यांनी युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून लाखो रुपये जमा केल्याचा आरोप केला आहे. ट्विट करत संजय राऊत यांनी सोमय्यांवर नवा आरोप केला आहे. संजय राऊत यांनीच आयएनएस विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर, बाप-बेटा जेलमध्ये जाणारच, असेही ते ठणकावून सांगत होते. आता राऊत यांनी दुसरा घोटाळा असल्याचा आरोप केल्यामुळे, किरीट सोमय्या काय खुलासा करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोमय्यांच्या तक्रारीनंतर ईडीकडून खासदार संजय राऊत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नातेवाईकांवर धाडी टाकल्या होत्या. त्यामुळे, शिवसेना नेते सोमय्यांना लक्ष्य करत आहेत. त्यातूनच दोनवेळा किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. तर, संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांतप्रकरणी सोमय्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

नवलानी घोटाळ्याचा पार्ट 2
आयएनएस विक्रांतसाठी निधी गोळा करुन हडप केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावरुन, भाजप नेते किरीट सोमय्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुन्हा संजय राऊत यांनी सोमय्यांवर घोटाळ्याचा आरोप केला आहे. युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून किरीट सोमय्यांनी लक्षावधी रुपये जमा केला आहेत. ही स्वयंसेवी संस्था किरीट सोमय्यांच्या माध्यमातून चालवली जाते. जे किरीट सोमय्या सध्या आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्यात जामीनावर तुरुंगाबाहेर आहेत. असे सांगायला ही राऊत विसरले नाही. तसेच, जर पोलिस आणि चॅरिटी आयुक्तांनी याचा तपास केला तर, याचे धागेदोरे नवलानी घोटाळ्यात सापडतील, हा नवलानी घोटाळ्याचा पार्ट 2 असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

सध्या सोमय्या जामीनावर बाहेर

आयएनएस विक्रांतमधील कथित गैरव्यवहार प्रकरणी सोमय्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमय्यांनी अटकपूर्व जामीनसाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पण तेव्हा काही दिवस सौमय्या काही दिवस गायब होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. यानंतर हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने सोमय्यांना जामीन मंजूर केलाय.

बातम्या आणखी आहेत...