आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरेंनी दिला राऊत कुटुंबाला धीर:उद्धव यांच्यासमोर संजय राऊत यांच्या आई, पत्नी झाल्या भावुक

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्या निवासस्थानी जात खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. संजय राऊतांना ईडीने 9 तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतले होते, त्यानंतर रात्री उशिरा ईडीने राऊतांना अटक केली. राऊतांना ईडीचे अधिकारी घेऊन गेले, त्यावेळी त्यांच्या मातोश्री हवालदिल झाल्याचे झाल्या, त्यांना आपण वाऱ्यावर सोडले नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दाखविले आहे. संजय राऊत हे एकटे नाहीत. शिवसेना परिवार राऊतांसोबत आहे, असा विश्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांना दिला आहे.

शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भांडुपमधील मैत्री या बंगल्यावर जात पक्षप्रमुख म्हणून सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या कुटुंबीयांना धीर देत संकटातून बाहेर काढण्याचे आश्वासन दिले आहे अशी माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरावर ईडीची धाड पडली. महाराष्ट्रातील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काल रात्री 12 वाजता अटक केली. साडेसहा तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली. राऊत रविवारी सायंकाळी 5.30 वाजता ईडी कार्यालयात पोहोचले होते. ईडीकडून राऊतांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. त्यानंतर संजय राऊत यांना ईडीने ताब्यात देखील घेतले आहे. आज त्यांना मेडिकल चेकअपसाठी जेजे रूग्णालयात नेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...