आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दावा:2024 पर्यंत देश दंगलीत होरपळून टाकायचा, त्यानंतर निवडणुका घ्यायच्या, हेच भाजपचे धोरण; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

2024 पर्यंत देश दंगलीत होरपळून टाकायचा आणि त्यानंतर निवडणुका घ्यायच्या किंवा पुढे ढकलायच्या, असे भाजपचे धोरण दिसत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. देशात दंगली कोण घडवत आहे, हे सर्वांना माहित असल्याचा आरोपही त्यांनी केला.

संजय राऊत म्हणाले, कालची महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा उत्तमरितीने पार पडली. नाना पटोलेंची तब्येत बरी नसल्याने ते येऊ शकले नाही. मात्र काँग्रेसचे अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात हे सगळे प्रमुख नेते या सभेला उपस्थित होते.

हा कुठला न्याय?

संजय राऊत पुढे म्हणाले, पंतप्रधान चहा विकून शिकले. त्यांनी B.A, M.A. Entire Politics यात शिक्षण घेतले. मात्र, अमित शहा यांनी समोर आणलेल्या डिग्रीबद्दल लोकांना संशय आहे. त्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी स्वतः समोर येऊन याबद्दल खुलासा करावा. आणि ही डिग्री नवीन बनवल्या जाणऱ्या संसदभवनाच्या प्रवेशद्वारावर लावा, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला. अरविंद केजरीवाल यांनी डिग्रीबद्दल विचारणा केल्यानंतर त्यांना 25 हजारांचा दंड ठोठावला, हा कुठला न्याय? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

पंतप्रधान अनपढ आहेत का?

गुजरात हायकोर्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री सार्वजनिक करण्याचा आदेश रद्द ठरवल्यानंतर आता विरोधकांनी हा मुद्दा आक्रमकपणे लावून धरला आहे. जे पंतप्रधान स्वतःचे 'शिक्षण' लपवत आहेत, त्यांची 'उगाच बदनामी करण्याचे कष्ट कोण कशाला करेल. पंतप्रधान अनपढ आहेत काय? त्यांचे शिक्षण किती? असा टोला आजच्या सामनातून लगावण्यात आला आहे.

दंगली घडवण्यासाठी विंग

संजय राऊत म्हणाले, दंगलखोर कोण आहेत, आणि या देशात दंगली कोण घडवतय माहित आहे. काल हुबळीमध्ये दंगल कोणी घडवली, हावडाला दंगल कोण घडवत आहे? महाराष्ट्रात दंगली कोण घडवतय? भाजपने दंगली घडवण्यासाठी एक विंग तयार केली आहे. 2024 पर्यंत देश दंगलीत होरपळून टाकायचा आणि त्यानंतर निवडणुका घ्यायच्या किंवा पुढे ढकलायच्या. महाराष्ट्रात शिंदे-भाजप सरकार कमकुवत आहे. ज्या ज्याठिकाणी भाजपला भीती आहे, ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही त्याठिकाणी दंगे घडवले जात आहेत.

राऊत यांचे ट्विट

संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीचा फोटो ट्विट केलाय. राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘आपल्या पंतप्रधान मोदी यांची ही डिग्री बोगस असल्याचे लोक म्हणतायत. पण मी म्हणतो- ‘Entire Political Science’ या विषयावरील ही ऐतिहासिक आणि क्रांतिकारी डिग्री आहे. नव्या संसद भवनाच्या मुख्य द्वारावर ही फ्रेम करून लटकवली पाहिजे. यामुळे पंतप्रधानांच्या डिग्रीवरून लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाहीत