आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीत अशा काही शक्ती बसल्या आहेत, ज्यांना महाराष्ट्र तोडायचा आहे. महाराष्ट्रपासून मुंबई वेगळी करायची आहे. त्यासाठी डाव रचले जात आहे, असा आरोप करत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबईला वेगळे करण्याचा डाव
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, मुंबईसह महाराष्ट्र व्हावा, यासाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. 1961 नंतर जन्मलेल्या पिढीला हा इतिहास माहित नाही. तेव्हा महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा डाव मराठी क्रांतिकारकांनी उधळून दिला होता. आता तशाच काही शक्ती दिल्लीत बसल्या आहेत. त्यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायचे आहे.
महाराष्ट्रासाठी प्राण द्यायला तयार
संजय राऊत म्हणाले, दिल्लीतील या शक्तींचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. महाराष्ट्रासाठी पुन्हा प्राण द्यायला आम्ही तयार आहोत. आमच्या शरीरात मराठ्यांचे रक्त असेपर्यंत महाराष्ट्रासाठी आम्ही झुंजत राहू. भाजप संविधानाला मानत नाही. त्यामुळेच आज महाराष्ट्र अस्थिर आहे. त्यामुळेच संविधानाचे रक्षण करण्यासाठी, महाराष्ट्राचे रक्षण करण्यासाठी आम्ही वज्रमूठ आवळली आहे.
देशात घटनात्मक संस्थांची पायमल्ली
संजय राऊत म्हणाले, देशभरात संविधानाचे खच्चीकरण सुरू आहे. बिगर भाजपशासित राज्यांमध्ये कायदा धाब्यावर बसवला जात आहे. कायद्याचे राज्य मोडून काढले जात आहे. ज्या संविधानाने न्यायालय, निवडणूक आयोग अशा घटनात्मक संस्थांची उभारणी केली. अशा संस्थांची सर्रास पायमल्ली केली जात आहे. या संस्थांवर एका राजकीय पक्षाचा मालकी हक्क सांगितला जात आहे.
नव्या पिढीसाठी योजना करावी
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र हे एक राज्य म्हणून कायमच देशात आघाेडीवर राहिले आहे. 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून मुंबईसह महाराष्ट्र आपल्याला मिळाला आहे. आजच्या नव्या पिढीला हा इतिहास माहित नाही. 1961 नंतर जे जन्माला आले त्यांना आधी महाराष्ट्रात काय महाभारत घडले ते ठाऊक नाही. नव्या पिढीला या संघर्षाची माहिती मिळावी, यासाठी महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात एखादी योजना तयार केली पाहिजे.
मोदींचे संविधानावर प्रेम नाही
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र आज अस्थिर दिसतो आहे. त्याला पूर्णपणे जबाबदार संविधानाची पायमल्ली करुन जे सरकार राज्यात आले ते आहे. देशाचे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना संविधानावर अजिबात प्रेम नाही. संविधानापेक्षा पंतप्रधानांचे 'मन की बात'वर जास्त प्रेम आहे. मोदींचे संविधानावर प्रेम असते तर देशात अशी स्थिती नसती.
संबंधित वृत्त
टोला:पंतप्रधान मोदींचे 'मन की बात'वर जेवढे प्रेम, तेवढे संविधानावर नाही; आता 'जन की बात' ऐकावी- संजय राऊत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आपल्या 'मन की बात' या कार्यक्रमावर जेवढे प्रेम आहे, तेवढे देशाच्या संविधानावर नाही. अन्यथा देशातील स्थिती वेगळी असती, असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे. आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा आज मुंबईत होत आहे. संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी ही सभा आहे. नरेंद्र मोदींनी 'मन की बात'वर जेवढे प्रेम केले तेवढे प्रेम देशावर, संविधानावर केले असते तर देशातील लोकशाही धोक्यात आली नसती. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.