आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुमच्या इशाऱ्यावर कायदा चालतो का? मिस्टर केसरकार मला अटक करा अथवा मला गोळ्या घाला; मी पुन्हा सांगतोय, मै झुकेगा नहीं साला असे ट्विट करत संजय राऊत यांनी दीपक केसरकर यांना प्रत्युत्तर दिले आहे. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये संजय राऊतांनी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना देखील टॅग करत या धमक्यांकडे आपण पाहत असाल असे म्हटले आहे.
दीपक केसरकर यांनी संजय राऊतांबद्दल वक्तव्य करताना त्यांना पुन्हा जेल मध्ये जायचंय का? असे विधान केले होते. त्यांच्या याच विधानाचा संजय राऊतांनी समाचार घेतला आहे. 'न्याय व कायदा तुमच्या कोठीवर नाचत आहे ? खोके देऊन त्यांना गुलाम केले आहे. हुकूशाहीचा अंत होईल. तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही. खून करा नाहीतर तुरुंगात टाका'. असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.
काय म्हणाले होते केसरकर?
मंगळवारी दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांना पुन्हा जेलमध्ये जायची हौस आहे का? असा सवाल उपस्थित करत टोला लगावला होता. यावर संजय राऊत यांनी देखील आपण 2024 मध्ये जेलमध्ये जाण्याची तयारी करावी अशी टीका केली होती.
आम्ही लफगें नाहीत
संजय राऊत आज माध्यमांशी बोलताना म्हणाले, आम्ही पळपुटे नाही, आमच्या पक्षासाठी महाराष्ट्रासाठी आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. आम्ही लफगें नाहीत असे म्हणत त्यांनी दिपक केसरकरांना टोला लगावला आहे. केसरकर हे कायदा किंवा न्यायालय नाहीत, ते जर असे बोलले असतील तर त्यांनीही जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी सर्व तयार असल्याचा इशाराच संजय राऊतांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.