आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामला फासावर लटकवणार का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे. आता तेवढेच शिल्लक राहिले आहे. आत्तापर्यंत तुरुंगात डांबले, हेही करुन दाखवा. असा टोला त्यांनी लगावला.
संजय राऊत म्हणाले, मला हक्कभंगाची कोणतीही नोटीस आलेली नाही. मी विधिमंडळाचा अपमान होईल, आमदारांचा अपमान होईल असे विधान केलेले नाही. एक विशिष्ट गट जो शिवसेना आमची आहे, असे म्हणत आहेत त्यांना मी चोर म्हटले आहे. त्यांनी शिवसेना, धनुष्यबाणाची चोरी केली. जे बेकायदेशीर आहे. हे विधान मी बाहेर केले. त्यामुळे हक्कभंग होतो की नाही पाहावे लागेल. माझी बाजू समर्थपणे मांडेल.
नाराजी नाही
संजय राऊत म्हणाले, शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील बैठकीत माझ्या विधानावर नाराजी व्यक्त केली नाही. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. संविधान, घटना, नियम याबाबत ते जागृत असतात. काल पवारांनी जी भूमिका मांडली ती महत्त्वाची आहे. जी हक्कभंग समिती आहे ती पक्षपाती आहे, असे ते म्हणाले. या समितीत मूळ शिवसेनेचा एकही व्यक्ती नाही. ज्यांनी तक्रारी केल्या त्यांनाच न्यायाधीश करण्यात आल्याच प्रकार लोकशाहीला धरुन नाही.
चिंचवडचे सुद्धा कसब्यासारखे झाले असते
कसब्याचा निकाल आल्यापासून त्यांना कालपासून घाम फुटला आहे. त्यांची थोडीफार जी झोप शिल्लक होती तीही उडाली आहे. कसब्यात पराभव झाला. पण चिंचवडमध्येही त्यांचा विजय झाला हे मानायला मी तयार नाही. मागच्या निवडणुकीत कसब्यात राष्ट्रवादीला 44 हजार मते मिळाली होती. या निवडणुकीत लाखावर मते मिळाली. भाजपने आमच्यातील बंडखोर उभा केल्याने त्यांना यश मिळाले. अन्यथा चिंचवडचे सुद्धा कसब्यासारखे झाले असते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.