आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाईची मागणी:भाजप नेते मोहित कंबोज बेधुंद अवस्थेत मुलींबरोबर, तपास करा, गृहमंत्री कोणाच्या खिशात? राऊतांचा आरोप

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. राऊत म्हणाले की, कंबोज रात्री साडेतीन वाजता बारमध्ये बेधुंद अवस्थेत मुलींबरोबर नाचत होते, याचा तपास करावा, महाराष्ट्राचे गृहमंत्री कोणाच्या खिशात आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी संभाजी ब्रिगेड संघटनाप्रमुख सचिन कांबळे यांचा व्हिडिओ टविट केला आहे. यात सचिन कांबळे म्हणताय की, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज हे रात्री साडेतीन वाजता लिंक रोड खार पश्चिम येथील रेडिओ बार येथे मुलींना घेऊन नाचत असल्याचा दावा करताना दिसून येत आहे.

सचिन कांबळे पुढे व्हिडिओत म्हणताय की, येथे कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? आमच्या सभा असल्या की रात्री 10 साडेदहा वाजता सर्व काही बंद करायला लावता. हे मात्र, रात्री साडेतीन वाजेपर्यंत मुलींसोबत नाचू शकतात असा संतप्त सवाल सचिन कांबळेंनी उपसथित केला आहे.

राऊतांचे नेमके टविट काय?

पहाटे 3.30 वाजता बार सुरू असल्याचे ट्विट खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तर महाराष्ट्राचे गृहमंत्री कोणाच्या खिशात आहेत? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. शेवटपर्यंत पहा. पोलिस हतबल आहेत..हे तर काहीच नाही.. कायद्याचे धिंडवडे काढणारे फुटेज मी पोलिस आयुक्तांना पाठवत आहे. मी वाट पाहतोय पोलिस काय कारवाई करत आहेत. हिंदुत्व नशेच्या व्यापारात अडकले आहे का असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला असून या ट्विटमध्येही गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, मुंबई पोलिसांना टॅग केले आहे.

संजय राऊत म्हणाले की, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुंबई पोलिस आयुक्त यांनी महाशय आपण काय कारवाई केली ते जनतेला कळू द्या. येथे अमली पदार्थांचे सेवन आणि विक्री होत असल्याची माहिती आहे.. भाजपचे हिंदुत्व येथे काय करीत होते? सीसीटीव्ही फुटेज लगेच ताब्यात घ्या. खोक्यांचे राज्य हे अमली पदार्थांचे राज्य होऊ नये. जय महाराष्ट्र! असे ट्विट करत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.