आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानारायण राणे म्हणतात 2004 साली त्यांनी मला खासदार केले. माझी नेमणूक करण्यासाठी नारायण राणे हे शिवसेना प्रमुख होते का? असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राणे यांना विचारला आहे. नारायण राणे यांनी माफी मागितली नाही तर न्यायालयात खटला दाखल करणार असल्याचेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत म्हणाले, आता ती वेळ आली आहे. कायदेशीर लढाई लढू. नारायण राणे म्हणाले की, 2004 साली त्यांनी मला खासदार केले. माझी नेमणूक करण्यासाठी नारायण राणे हे शिवसेना प्रमुख होते का? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यावेळी काय करत होते? आता नारायण राणेंनी बाळासाहेबांची शिवसेनाप्रमुख म्हणून मीच निवड केली हे सांगणे बाकी आहे. अशी टीका संजय राऊत यांनी केली.
मी देशाचा नागरिक
संजय राऊत म्हणाले, नारायण राणे काहीही वक्तव्य करु शकतात. 2004 साली मी सामनाचा संपादक होतो. माझे मतदारयादीत नाव नाही असेही ते म्हणाले. गेली 25 वर्षे मी मतदान करत आहे. मी पाकिस्तानी, बांग्लादेशी नागरिक आहे का? माझे शिक्षण मुंबईत झाले. मी देशाचा नागरिक आहे. मला मतदानाचा हक्क आहे. 2004 साली देखील माझे नाव मतदार यादीत होते.
आरोप सिद्ध करा
संजय राऊत म्हणाले, राणे खोट बोलत आहेत. त्यांनी मतदार यादीतील माझा फॉर्म पाहावा. मला आता त्याविषयी काही बोलायचे नाही. त्यांनी माफी मागितली नाही तर न्यायालयात खटला दाखल करणार आहे. शिवसेनेचे सर्वच नेते असे खटले दाखल करणार आहे. त्यांनी जे आरोप केलेत, ते सिद्ध करावे. तुम्ही केंद्रात मंत्री आहात देश लुटला गेलाय. त्यावर हे बोलताय का?
आडबोलेंसाठी उमेदवार मागे घेतला
काल जाहीर झालेल्या निकालावर संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला. राऊत म्हणाले, शिक्षक आणि पदवीधरांनी भाजपला नाकारले आहे. नागपूरच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाची जागा शिवसेनेसाठी सुटली होती. मात्र महाविकास आघाडीच्या आडबोले यांच्यासाठी आम्ही आमचा उमेदवार मागे घेतला.
झाशीच्या राणीसारख्या लढल्या
संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून आमचा विजय झाला आहे. नाशिकमध्ये आम्ही शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. त्या निवडून आल्या नसल्या तरी झाशीच्या राणीसारख्या त्या लढल्या. सत्यजीत तांबे हे काँग्रेसबरोबरच राहतील. याची खात्री असल्याचे राऊत म्हणाले.
मविआ म्हणून लढणार
संजय राऊत म्हणाले, नागपूरमध्ये भाजपच्या कारभाराला जनता विटली आहे. त्यामुळेच मविआच्या उमेदवाराचा विजय. जनतेने स्पष्ट कौल दिला. भाजपचा आणि मिंधे गटाचा पराभव करण्यासाठी आम्ही मविआ म्हणून लढणार. यापुढेही एकी असेल.भाजपकडे उमेदवारच नव्हते. औरंगाबादेत किरण पाटील कुठल्या पक्षातून आलेले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.