आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा67 वर्षांत LICचा एका रुपयाही बुडाला नाही. मात्र, मोदी सरकारच्या काळात गेल्या 7 वर्षांत LICचे 50 हजार कोटींचे नुकसान झाले, अशी टीका आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला.
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, केंद्र सरकारच्या निर्लज्जपणामुळे LICच नुकसान होत आहे. आजपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात विरोधक यावर आक्रमक होणार आहेत. याबाबत आज विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक होत असून यात जो निर्णय होईल, तो शिवसेनेला मान्य असेल.
अदानींचा महाघोटाळा
संजय राऊत म्हणाले, अदानींचा घोटाळा म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात झालेला महाघोटाळा आहे. याविरोधात संसदेत आम्ही विरोधक पूर्ण ताकदीने सरकारला घेरणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात करण्याऐवजी यावर भूमिका स्पष्ट केली पाहीजे.
चिंचवडबाबत ठाकरे गट आग्रही
दुसरीकडे, कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने रविंद्र धंगेकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली आहे. तर, चिंचवडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार, असा निर्णय मविआने घेतल्याचे ट्विट महाराष्ट्र काँग्रेसने केले आहे. मात्र, चिंचवडबाबत आज निर्णय व्हायला पाहीजे, असे म्हणत संजय राऊत यांनी अजूनही ठाकरे गटाने चिंचवडच्या जागेच आग्रह सोडला नसल्याचे स्पष्ट केले. संजय राऊत म्हणाले, आज प्रमुख मविआ नेत्यांची बैठक होईल. तेव्हा चिंचवडच्या जागेबाबत निर्णय होईल.
मविआचे ठरले:कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे रविंद्र धंगेकर, तर चिंचवडमधून राष्ट्रवादी काँग्रेस लढणार
RSS बदलतोय
जाती ईश्वराने बनवल्या नाहीत, तर त्या ब्राह्मणांनी निर्माण केल्या आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईत संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात केले. त्यावर संजय राऊत म्हणाले, हळूहळू संघ बदलत आहे. संघ जातविरहीत राजकारण करणार असेल तर त्यांनी सर्वात आधी समज सरकारी पक्षाला द्यायला हवी, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
हेही वाचा
शिवसेनेचा देवेंद्र फडणवीसांना टोला:नाणार प्रकल्प केला तर भराडी देवाची कोप होईल, तुमचे राज्य गुवाहाटीच्या रेड्यांप्रमाणे बळी जाईल
नाणारचा प्रकल्प करू नका, असा भराडी देवीचाच कौल आहे व तो कौल टाळून काही कराल तर देवीचा कोप होईल व तुमचे राज्य गुवाहाटीच्या रेड्यांप्रमाणे बळी जाईल, असा टोला शिवसेनेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.