आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजामत:आमदार संतोष बांगरांनी मिशा काढल्यात का? नाहीतर एखाद्याला भादरायला पाठवतो; संजय राऊतांचा टोला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार संतोष बांगर यांनी मिशा काढल्या आहेत का? नसेल काढल्या तर एखाद्याला हजामत करायला पाठवतो, असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांना लगावला आहे.

काय म्हणाले संतोष बांगर?

कळमनुरी कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूक सर्वच्या सर्व 17 जागा निवडून आणल्या नाही तर मिशा काढून टाकेल, अशी घोषणा शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी केला होता. मात्र, कळमनुरी बाजार समितीत बांगर गटाच्या केवळ 5 जागा निवडून आल्या. तर, महाविकास आघाडीने 12 जागांवर दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे आपल्या वक्तव्यामुळे संतोष बांगर आता अडचणीत आले असून विरोधकांकडूनही त्यांना जोरदार चिमटे काढले जात आहे.

निकाल गद्दारांच्या विरोधात

आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनीही संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत म्हणाले, कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे निकाल गद्दारांच्या विरोधात गेले आहेत. कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकांमध्ये यापूर्वी शिवसेना पूर्ण ताकदीने उभी राहत नव्हती. यंदा प्रथमच महाविकास आघाडीसोबत शिवसेना निवडणुकांना सामोरी गेली.

हजामत करण्यासाठी एखाद्याला पाठवतो

संजय राऊत म्हणाले, ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेसोबत गद्दारी झाली. जिथे जिथे गद्दारांचे पॅनेल उभे राहीले तिथे त्यांचा पराभव झाला आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे पॅनल निवडून आले. हारलो तर मिशा काढू, अशा वल्गना काहींनी केल्या होत्या. त्यांनी आपल्या मिशा काढल्या आहेत का? नसतील काढल्या तर त्यांच्या मिशा भादरण्यासाठी, हजामत करण्यासाठी आम्ही एखाद्याला पाठवतो.

मोहित कंबोज यांच्यावर टीका

भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावरही संजय राऊत यांनी सडकून टीका केली. संजय राऊत म्हणाले, मोहित कंबोज हे मद्यधुंद अवस्थेत एका बारमध्ये होते. त्याचा व्हिडिओ मी पोलिसांकडे पाठवला आहे. त्या बारमध्ये ड्रग्ज, अमली पदार्थाचा व्यापार चालतो. त्याच बारमध्ये मोहित कंबोज होते. मुळात तो बारच बेकायदेशीर आहे. महापालिकेच्या अनेक नियमांचे उल्लंघन करून तो बार बनवण्यात आला आहे. पोलिसांनी त्यावर कारवाई करावी.

संबंधित वृत्त

गंभीर आरोप:बारसूत सौदी अरेबियाच्या राजपुत्राचा कारखाना, केंद्रीय मंत्र्यांपासून अनेकांना मोठ्या प्रमाणात खोके गेले- संजय राऊत

रत्नागिरीतील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाचा जो कारखाना होत आहे, तो सौदी अरेबियाच्या राजपुत्राचा आहे. हा कारखाना व्हावा, यासाठी कोकणातील केंद्रीय मंत्र्यांपासून अनेकांना मोठ्या प्रमाणात खेके दिले गेले आहेत, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, सौदी अरेबियाच्या राजपुत्राची गुंतवणूक बारसूत होत आहे. त्या गुंतवणुकीची किकबॅक म्हणून काही पैसे आधीच काहींना देण्यात आली आहे. काही जणांना या गुंतवणुकीपासून दलाली मिळाली आहे. त्यासाठीच परप्रांतियांनी बारसूत जमिनी गिळल्या आहेत आणि हे सरकार या परप्रांतियांचे संरक्षण करत आहेत. वाचा सविस्तर