आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्युत्तर:शरद पवारांसोबत कुणी नव्हते तेव्हा आम्ही बाजू घेतली, तुमच्याकडे काही असेल तर बोलण्याची हिंमत ठेवा - संजय राऊत

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरद पवारांसोबत कुणी नव्हते, तेव्हा आम्ही तुमची बाजू घेतली. आता तुमच्याकडे काही असेल, तर बोलण्याची हिंमत ठेवा, असा इशारा संजय राऊत यांनी बुधवारी दिला. शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांनी हे उत्तर दिले. विशेष म्हणजे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील हल्लाबोल केला.

सामनाला महत्त्व द्या, असे मी कुठे म्हणतो. मी माझ्या पक्षाचे म्हणणे मांडत असतो. तुम्ही तुमचे म्हणणे मांडा. गेली 40 वर्षे आम्ही राजकीय भाष्य करत आहोत, यांची जाणीव ठेवा याची आठवणही राऊतांनी पवारांना करून दिली.

आम्हाला न्याय मिळणार

देशातील राजकीय स्वैराचार रोखण्याची ताकद कोर्टात आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल असे आम्हाला आजही वाटते, असे सांगतानाच राहुल नार्वेकर यांनी आधी पदाचा राजीनामा द्यावा. ज्यांनी आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेतला आहे. त्यांना निर्णय घेऊ द्या. आम्ही न्यायालयाच्या निकालाची वाट पाहतोय असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, नरहरी झिरवळ यांनी आमदार अपात्रतेचा निर्णय घेतला होता. त्यांच्याकडेच हे प्रकरण गेले पाहिजे. त्यांचा निर्णय दुसरा अध्यक्ष फिरवू शकत नाही.

राहुल नार्वेकरांनी राजीनामा द्यावा

संजय राऊत म्हणाले की, कायदा मंत्र्याने बंद दरवाजाआडच्या बैठकीत काय होणार हे सांगितले का? तुमच्याकडेच प्रकरण येईल हे तुम्हाला कसे माहीत? ही कोणती दादागिरी आहे? कायदा मंत्री 3 तास बंद दाराआड चर्चा करतात हे काय चालले आहे?. राज्यातील आमदार अपात्रतेचे प्रकरण माझ्याच हातात येईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी थेट नार्वेकर यांचाच राजीनामा मागितला आहे.

कर्नाटकात भाजपचा पराभव

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, देशाचे पंतप्रधान महिनाभर कर्नाटकात तंबू ठोकून होते. गृहमंत्री आणि सर्व मंत्री कर्नाटकात प्रचार करत होते. पण कर्नाटकात इतिहास घडेल, 2024 साठी शुभसंकेत होईल. भाजपचा दारूण पराभव होणार आहे. हा पंतप्रधानांचा पराभव असेल.