आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊत यांचा योगी आदित्यनाथांना कडक इशारा:राजकारणाचे धंदे बंद करा, सन्मानाने आलात सन्मानाने परत जा!

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुंतवणूक करण्यासाठी रोड शो ची गरज नाही. हे राजकारणाचे धंदे बंद करा. सन्मानाने आलेले आहात सन्मानाने परत जा. तुमच्याविषयी आम्हाला प्रेम-आदर आहे. शक्यतो हे राजकीय उद्योग येथे येऊन करु नका. असा इशारा शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे.

जर कोणते राज्य सिनेउद्योग वाढवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर देशासाठी चांगलेच आहे. रोड शो ची गरज काय? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी भाजपवर देखील निशाणा साधला.

याठिकाणी कशासाठी आला आहात?

खासदार संजय राऊत म्हणाले, योगी आदित्यनाथ मुंबईत रोड शो का करत आहेत? जर ते येथील उद्योगपतींची भेट घ्यायला त्यांच्या राज्याच्या विकासाबाबत चर्चा करायला आले असतील तर त्यावर आक्षेप घेण्यासारखे काही नाही. मात्र जर ते आमच्याकडचे उद्योग ओरबडून घेणार असतील तर आम्ही आक्षेप घेऊ. मुंबईत गुंतवणूकीसाठी रोड शो करणार असतील तर त्याची काय गरज आहे. आपण येथे राजकारण करायला आला आहात की आपल्या राज्याचा विकास साधायला असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

मुंबई चित्रपटसृष्टी देशाची

पुढे संजय राऊत म्हणाले, मुंबईची चित्रपटसृष्टी ही पूर्ण देशाची आहे. दादासाहेब फाळकेंनी चित्रपटसृष्टीचा पाया रचला. ते महाराष्ट्राचे होते. जर योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या राज्यात फिल्मसिटी बनवू इच्छित असतील तर त्याचे स्वागत आहे. हैदराबादमध्ये देखील फिल्म इंडस्ट्री आहे. आणि मुंबईतील चित्रपटसृष्टी कोणी घेऊन जाऊ शकत नाही. अमिताभ बच्चन, माधुरी दिक्षित येथून लखनऊ, गाझियाबादला जाऊन राहणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावरच त्यांची रोजीरोटी

भाजपवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, बावणकुळे जी रणनिती ठरवत आहे ती म्हणजे दुसरे काही नसून खोके, पाकिटे, कोणाला कसे विकत घ्यायचे? ही भाजपची रणनिती आहे. चंद्रशेखर बावणकुळेंच्या वक्तव्यावरुन राऊत म्हणाले, जे त्यांच्या पोटात होते ते ओठात आले. आज औरंगजेबजी म्हटले उद्या कसाबजी, अफजलजी म्हणतील. मग शाहिस्तेखानजी म्हणतील. यावरच त्यांची रोजीरोटी असल्याची टीकाही त्यांनी केली.

योगी मुंबई दौऱ्यावर

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती होती. योगी आदित्यनाथ आज देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथून देशांतर्गत रोड शोची सुरुवात करतील

बातम्या आणखी आहेत...