आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आता 10 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे यंदाचा राऊतांचा दसरा हा तुरुंगातच जाणार हे स्पष्ट होतय.
राऊत यांच्या जामीन अर्जाला ईडीने विरोध केला असून त्यामुळे त्यामुळे त्यांच्या जामीन अर्जाची पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला होणार आहे. सध्या ही सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.
संजय राऊत यांच्या वकिलांचा युक्तीवाद आज पूर्ण झाला असून, पुढच्या तारखेला ईडीकडून युक्तीवाद करण्यात येणार आहे. संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ व्यवहाराच्या नावाखाली आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप आहे. आर्थिक अफरातफर प्रकरणी ईडी कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी झालेल्या संजय राऊत यांनी जामीन मिळावा यासाठी अर्ज केला आहे. संजय राऊत यांच्या वकिलाचा जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आता ईडी जामीन अर्जावर त्यांचा युक्तिवाद करेल. यानंतर PMLA कोर्ट निर्णय घेणार आहे. जामीन अर्जावर निर्णय झालेला नाही त्यामुळे 10 ऑक्टोबरपर्यंत संजय राऊत न्यायालयीन कोठडीतच असतील.
दसरा कोठडीतच जाणार
आजच्या सुनावणी दरम्यान न्यायालयात संजय राऊत यांच्या वकिलाने जामिनावर युक्तिवाद पूर्ण केला. ईडीकडून युक्तिवाद करणयासाठी पुढची तारीख मागण्यात आली. त्यानुसार न्यायालयान 10 ऑक्टोबर ही पुढची तारीख दिलेली आहे. न्यायालयाने 10 ऑक्टोबरपर्यंत या प्रकरणातील सुनावणी तहकूब केली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा यंदाचा दसरा हा न्यायालयीन कोठडीतच जाणार आहे.
सुनावणी पुढे ढकलली
पत्राचाळ कथित घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले संजय राऊत यांनी या अगोदर जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतर राऊतांना विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. तेव्हा विशेष न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ केली होती. यावेळी ईडीला जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र पुन्हा सुनावणीवरील कारवाई पूर्ण होऊ न शकल्याने न्यायालयाने सुनावणी 27 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली होती. पत्राचाळ गैरव्यवहारातील एक कोटी सहा लाख रुपये प्रवीण राऊत यांच्यामार्फत संजय राऊत यांना मिळाल्याचा आरोप ईडीने केला होता.
काय आहे पत्राचाळ प्रकरण?
गोरेगावमध्ये गुरू आशिष कंपनीला चाळीच्या पुनर्विकासाचे काम देण्यात आले होते. कंपनीशी संबंधित प्रवीण राऊत यांनी या जागेतील एफएसआय परस्पर विकल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थनगर भागातील या झोपडपट्टीचे काम न करताच परस्पर काही वर्षांपूर्वी येथील एफएसआय बेकायदेशीररित्या विकण्यात आला. यात जवळपास 1 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. तसेच, प्रवीण राऊत यांनी 55 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नीच्या बँक खात्यात ट्रान्सफर केल्याचेही समोर आले आहे. या पैशांचा स्त्रोत काय, याचा शोधही ईडी घेत आहे. या संपूर्ण घोटाळ्यात संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे ईडीचे म्हणणे आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.