आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही:संजय राऊत यांचा मोठा दावा; म्हणाले - सरकार व्हेंटिलेटरवर, राज्यपालांची गच्छंती अटळ

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकार व्हेंटिलेटरवर असून, त्यात दोन उभे गट पडले आहेत. हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. शिवाय, राज्यपाल लवकरच जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संजय राऊत हे सद्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी आज नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली.

राजकारण परिवर्तनाच्या दिशेने जात आहे. राज्य घटना व संविधानानुसार सर्वाच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेतला तर 2024 च्या आधी परिवर्तन होणार. तर डॅमेज कंट्रोलसाठी आधी डॅमेज व्हावे लागते. काही लोक सोडून गेली तर आम्हाला काही फरक पडत नाही, असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर टीका केली.

पुढे ते म्हणाले की, शिवसेना एकच आहे. एकच राहील. गट तट हे तात्पुरते आहेत. बाळासाहेबांनी शिवसेना नावाचा वटवृक्षाचे बीज रोवले. त्या शिवसेनेचे नेतृत्व हे उद्धव ठाकरे करत आहे. त्यांना संपुर्ण महाराष्ट्राचा अशिवार्द आहे. शिवसेना महावृक्ष आहे. महावृक्षाचा पालापाचोळा पडतो. ते लोक उचलून नेतो. पालापाचोळा जाळून त्यांचा वापर शेकोटीसाठी केला जातो.

संज राऊत म्हणाले की, अधिवेशनात अनेक प्रकरणे समोर आली. 6 मंत्र्यांवर भष्ट्राचाराचे आरोप झाले. पुरावे मिळूनही एकावरही कारवाई झाली नाही. मात्र गेंड्याची कातडी पांघरल्यागत सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. पाण्यात बसलेल्या म्हशीप्रमाणे जणु काही घडलेच नाही, या अर्विभावात सरकार आहे. पण टीका केवळ विरोधी पक्षावर झाली. आंदोलन करणारी पिढी बदललली पण आंदोलन सुरूच राहतील.

मंत्रीपद जाण्याच्या भितीने राणे बेताल
नारायण राणे यांचे केंद्रीय मंत्रीपद धाेक्यात आल्यामुळे ते बेताल आहेत. शिंदे गटातील खासदारांना मंत्रीपद हवे असल्यामुळे तसेच राणे यांची कामगिरी सुमार असल्यामुळे त्यांचे पद जाईल. हिमंत असेल तर राणे यांनी समाेरासमाेर यावे. उद्धव ठाकरे आणि राणे यांची माझ्यानिमित्ताने भेट हाेत असेल तर आनंदच आहे, असे राऊत म्हणाले.

..तर उद्धव, रश्मी ठाकरे राऊतांना चपलेने मारतील

शिवसेना संपवण्याची सुपारी संजय राऊतने घेतलेली आहे. आत्ताच्या राजकारणातला संजय राऊत जोकर आहे, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. तसेच तु जिथे बोलावशील तिथे यायला मी तयार आहे म्हणत राऊतांचे चॅलेंज स्वीकारले आहे. संजय राऊत यांना आपण पुन्हा जेलवारी घडवणार, असल्याचा घणाघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता. तर नारायण राणेंनी केलेल्या हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी देखील तिखट शब्दांमध्ये 'माझ्या नादाला लागू नका. राजवस्त्र उतरवून या,', असे म्हणत पलटवार केला होता. आज पुन्हा एकदा नारायण राणेंनी संजय राऊतांवर टीका केली आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.

बातम्या आणखी आहेत...