आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sanjay Raut | Chandrakant Patil | Marathi News | "There Is No Jyotiraditya Shinde In Any Of The Three Parties", In Maharashtra Before Khela Hobe; Sanjay Raut's Chandrakant Patil

महाविकास आघाडी दिर्घ काळ चालेल:“तिन्ही पक्षात कोणीही ज्योतिरादित्य शिंदे नाही”, खेला होबे आधी महाराष्ट्रात; संजय राउतांचा चंद्रकांत पाटलांना टोला

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडी सरकारने दोन वर्ष पूर्ण केले असून, विरोधकांनी कितीही भ्रम निर्माण केला तरीही सरकार उत्तम चालले, हे सरकार प्रदीर्घ काळासाठी बनले आहे, असे उत्तर शिवसेना खासदार संजय राउत यांनी विरोधकांना दिले आहे. महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर राउतांनी आपली प्रतिक्रिया दिली.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नेहमी महाविकास आघाडी सरकार पडण्याचे भाकीत करत असतात. त्यावर प्रतिक्रिया देत राउतांनी चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केला. “चंद्रकांत पाटील यांनी सरकारला गुढीपाडव्यापर्यंत मुदत दिली. लहानपणी आम्ही ऐकायचो ‘गुढी पाडवा, नीट बोल गाढवा’, असे हे बोलत आहेत. त्यांनी असे करू नये. तुम्ही सरकार पाडायची वेळ निघून गेली. तुम्हाला वाटले सरकार पंधरा दिवसात पडेल, दहा दिवसात पडेल, असे सरकार पाडता येत नाही. हे त्यांना समजले पाहिजे.

केंद्रीय बळाचा, सत्तेचा वापर करून सरकार पाडण्याची वेळ निघून गेली. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात फरक आहे. आमच्याकडे तिन्ही पक्षात कोणीही ज्योतिरादित्य शिंदे नाही, त्यामुळे सरकार टिकणार”, असे म्हणत राउतांनी महाविकास आघाडी सरकार दिर्घ काळकाळ पर्यंत चालेल. असा इशारा दिला.

खेला होबे महाराष्ट्रात

ममताचे उदाहरण देत संजय राउत म्हणाले की, “मधल्या काळात सगळे विरोधीपक्ष दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली जमले होते. तेव्हा या बैठकीत तृणमूल काँग्रेसचे नेते बोलत होते, त्यांनी कसे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवत मोठा विजय मिळवला. तेव्हा मी उठून उभा राहिलो. त्यांना सांगितल तुमच्या आधी खेला होबे महाराष्ट्रात आम्ही करून दाखवले.

तीन भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येवून भाजपाला राज्यातून दूर ठेवले. थेट निवडून येऊन सत्ता स्थापन करणे सोपे असते. मात्र भूमिका वेगळ्या असलेल्या पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करायच आणि बलाढ्य, केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाला दूर ठेवायचे हे खऱ्या अर्थाने खेला होबे झाले.” असे संजय राउत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...