आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राऊतांचा खोचक टोला:काही लोक गांजा पिऊन बोलतात त्यामुळे राज्यात नशा मुक्ती कार्यक्रम राबवणे गरजेचे - शिवसेना खासदार संजय राऊत

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय राऊत यांनी ट्विटमध्ये काय म्हटले आहे?

राज्यात शिवसेना भवन फोडण्याच्या वक्तव्यावरुन भाजप आणि सेनेत मोठा सुरु झाला आहे. भाजप आमदाराच्या या वक्तव्यावर आमचे शाखा प्रमुख बोलतील अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. परंतु, त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन भाजप नेते नितेश राणे आणि प्रसाद लाड यांच्यावर खोचक टिका केली आहे. 'काही लोकांना गांजा पिऊन बोलण्याची सवय असल्याने राज्यात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम राबवणे गरजेचे असल्याचे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.'

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये काय म्हटले आहे?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नितेश राणे यांच्यावर टिका करत ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, "महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही. (समझनेवालोंको इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटगयांना हे कसे समजणार?"

काय म्हणाले होते प्रसाद लाड?
शनिवारी झालेल्या एका कार्यक्रमात भाजप आमदार प्रसाद लाड यांनी 'वेळ पडल्यास शिवसेना भवन देखील फोडू' असे वक्तव केले होते. दरम्यान, ते म्हणाले होते की, आम्ही माहीममध्ये आलो की त्यांना वाटत सेना भवनच फोडणार की काय? पण काही घाबरु नका वेळ आली तर ते देखील करु असे ते म्हणाले होते. यावेळी भाजप नेते नितेश राणेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...