आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुलाखत:संजय राऊतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची 'अनलॉक मुलाखत', काय म्हणतंय ठाकरे सरकार? म्हणत शेअर केला प्रोमो

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे मुखपत्र सामना या दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत पवारांनी अनेक खुलासे केले. आता यानंतर संजय राऊतांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. 'काय म्हणतंय ठाकरे सरकार?' असे शिर्षक देऊन त्यांनी मुलाखतीचा पहिला प्रोमो आज ट्विट केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांची 'अनलॉक मुलाखत' असं नाव त्यांनी या मुलाखतीला दिलेलं आहे. 

दोन भागांमध्ये ही मुलाखत असणार आहे. 25 आणि 26 जुलै रोजी ही मुलाखत शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'मध्ये प्रसिद्ध होणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच मुलाखत आहे. यापूर्वी उद्धव यांनी 'सामना'ला अनेक मुलाखती दिल्या आहेत. मात्र राज्याया प्रमुख म्हणून त्यांची ही पहिलीच मुलाखत आहे. दरम्यान संजय राऊतांनी ट्विटवर शेअर केले होते की, मुख्यमंत्री उद्धव टाकरेंची घणाघाती मुलाखत सामना साठी घेतली. सर्वच प्रश्नांना दिलखुलास ऊत्तरे मिळाली. उद्धव ठाकरे यांची दिलकी बात राजकारण ढवळून काढेल. करोना पासून राम मंदिरा पर्यंत मुख्यमंत्री ठाकरे दणक्यात बोलले. असे म्हणत त्यांनी या मुलाखतीविषयी माहिती दिली होती. आता मुख्यमंत्री या मुलाखतीत काय बोलणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.