आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधी पक्षाला देशद्रोही कसे म्हणता?:सुनिल प्रभू आक्रमक, नाना पटोले म्हणाले- हक्कभंगाबाबत एकमत असताना कामकाज तहकूब का?

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय राऊत यांनी जे वक्तव्य केले ते निषेधार्ह आहेच. हक्कभंग आणण्याबाबत एकमत असताना देखील सभागृह तहकूब का केले? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला. तर सुनिल प्रभू यांनी आक्रमक होत विरोधी पक्षाला देशद्रोही म्हणण्याचा अधिकार कोणी दिला? असे म्हणत सत्ताधाऱ्यांवरच कारवाई करण्याची मागणी केली.

नाना पटोले म्हणाले, संजय राऊत यांनी जे वक्तव्य केले त्याला समर्थन करण्याचे कुठलेही कारण नाही. विधीमंडळच नव्हे तर अशाप्रकारे राज्यातील जनतेचा अवमान करण्याचा अधिकार कोणाला नाही. सुमोटो आणण्याची कारवाई करायला हवी होती. मात्र जे दिवलभरासाठी जे विधानसभा तहकूब झाले ते योग्य नाही. आज आम्ही शेतकऱ्यांच्या वीजदराचे प्रश्न, दरवाढीबाबत प्रश्न आम्ही आज मांडणार होतो. मात्र यातून पळ काढण्यासाठी त्यांनी आजचे काम तहकूब केले. उद्या ते आमच्या प्रश्नांपासून वाचू शकणार नाही. असेही नाना पटोले म्हणाले.

कसे सहन करतात?

सुनिल प्रभू म्हणाले, विरोधी पक्षाने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर बहिष्कार टाकला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ म्हणाले की, बरे झाले देशद्रोह्यांसोबत मी चहापाणी घेतले नाही. विरोधकांना एक हक्क आहे. जर राज्याचे मुख्यमंत्री अशाप्रकारे विरोधकांना देशद्रोही म्हणत असतील तर अध्यक्षांनी हे कसे सहन करतात? ज्या 12 कोटी जनतेने आम्हाला विरोधीपक्ष म्हणून याठिकाणी बसवले आहे त्या जनतेचाही हा अपमान आहे. विरोधकांना अशाप्रकारे देशद्रोही म्हणणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी देखील सुनिल प्रभू यांनी केली.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत म्हणाले, विधिमंडळ नाही हे चोरमंडळ आहे. ही बनावट शिवसेना आहे. ड्युप्लिकेट चोरमंडळ आहे. आम्हाला पदावरून काढले तरी आम्ही पक्ष सोडणार आहे का? आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अनेक पदे दिली आहेत. आम्ही अशी पदे ओवाळून टाकतो. आम्ही लफंगे नाहीत. पदे परत येतील. आमचा पक्ष महत्त्वाचा आहे, अशी टीका त्यांनी केली.

संबंधित वृत्त

संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर दोन्ही सभागृहात गोंधळ

संजय राऊत यांच्या चोरमंडळ या वक्तव्याचे विधानसभेत जोरदार प्रतिसाद उमटले. शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी हक्कभंग आणण्याची मागणी केली. वाढत्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. यानंतर खासदार संजय राऊत यांना अटक करा अशी मागणी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली आहे. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...