आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजचा निर्णयावर देशात लोकशाही आहे की नाही हे समजेल. सर्वोच्चच न्यायालय संविधान आणि लोकशाहीची हत्या करणार नाही, असा विश्वास ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. ते मुंबईत बोलत होते.
दरम्यान निकालाआधी यावर बोलणे जर देवेंद्र फडणवीसांना मुर्खपणा वाटत असेल, तर त्यांनी मांडीवर घेतलेल्या लोकांना आधी शांत करावे. तेच आमच्या बाजूने निकाल लागणार असे म्हणत सुटलेत, असे म्हणणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे, याची आठवणही राऊतांनी करून दिली.
काय म्हणाले राऊत?
जेव्हा या 16 आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यावेळी विधानसभा अध्यक्षपदावर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे बसले होते. त्यांनी घेतलेला 16 आमदारांच्या बाबतीतील निर्णय हा योग्यच आहे. राहुल नार्वेकरांची नियुक्तीच घटनाबाह्य आहे. त्यामुळे निर्णय त्यांच्याकडे येऊच शकत नाही. कायद्यापने आणि घटनेने निर्णय झिरवळ यांच्याकडे यायला हवा. आम्हाला सर्वांना न्यायाची अपेक्षा आहे. आम्ही न्याय विकत घेणारी माणसे नाही. जे न्याय विकत घेऊ शकतात ते सत्तेवर आहे. त्यांना जी खात्री वाटते की आम्ही न्याय विकत घेऊ शकतो, ते लोक सत्तेवर बसले आहेत. त्यांना जी खात्री वाटते निर्णय आमच्या बाजूने लागेल अशी. आम्ही न्याय विकत घेऊ शकतो हा मस्तवालपणा आहे.
राऊत पुढे म्हणाले की, आम्ही तसे म्हणणार नाही. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. घटनापीठ जे आहे, सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी प्रदीर्घ काळ भूमिका ऐकली आहे. आम्ही निर्णयाच्या प्रतीक्षेत आहोत. आम्हाला खात्री आहे की सुप्रीम कोर्ट संविधानाची आणि लोकशाहीची हत्या करणार नाही. आजचा निर्णय स्पष्ट करेल की देशात लोकशाही आहे की नाही, स्वतंत्र टिकले आहे की नाही. या देशात संसद, विधानसभेचे महत्त्व आहे की नाही, या देशात न्यायालये स्वतंत्र आहे की नाही, आज त्याचा निर्णय होणार आहे.
भाजपसह शिंदे गटावर टीकास्त्र
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर बोलतात की निकालाच्या आधी बोलणे मुर्खपणा आहे तर त्यांनी तर शिंदे गटातील लोकच बोलताय की निकाल आमच्या बाजूने लागेल. त्यांनी या मुर्खांना आवरायला पाहिजे. कोण कुठे जाते हे निकाल आले की कळेलच, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संबंधित वृत्त वाचा
चर्चा तर होणारच:काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ; संजय राऊत यांचे सूचक ट्विट
महाराष्ट्राच्या सत्ताकारणात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातील सत्तासंघर्षाचा निकाल आज घोषित करण्यात येणार आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.