आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्हाला माफ करणारे तुम्ही कोण?:संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, म्हणाले- माफ करायचे की नाही, हे आम्ही ठरवणार

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आम्हाला माफ करणारे तुम्ही कोण?, असा सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना केला आहे. तसेच, तुम्हाला माफ करायचे की नाही, हे तुम्ही नव्हे तर आम्ही व महाराष्ट्रातील जनता ठरवणार आहोत, असेही संजय राऊत म्हणाले.

विरोधकांनी आम्हाला प्रचंड त्रास दिला आहे. मात्र, होळीनिमित्त आम्ही त्यांना माफ करत आहोत, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.

शिवसेना फोडून महाराष्ट्रावर आघात केला

संजय राऊत म्हणाले, भाजपने मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारा प्रमुख पक्ष फोडला आहे. मराठी माणूस, मराठी माणसाचा स्वाभिमान असणाऱ्या पक्षाचेच अस्तित्त्व संपवण्याचा प्रयत्न भाजपने केला. यासाठी तपास यंत्रणांचा, पैशांचा गैरवापर केला. शिवसेना फोडून भाजपने महाराष्ट्रावर आघात केला आहे. त्यामुळे त्यांना माफ करायचे की नाही, हे आम्ही ठरवणार.

माफीचे वाटप करत आहात का?

संजय राऊत म्हणाले, भाजपने जो गुन्हा केला आहे, तो गुन्हा महाराष्ट्रातील जनता कधीही विसरणार नाही. जनता भाजपला कधीही माफ करणार नाही. राज्यातील जनता ही वेदना कधीही विसरू शकणार नाही. देवेंद्र फडणवीस वारंवार याला माफ केले, त्याला माफ केले म्हणत आहे. देवेंद्र फडणवीस काय माफीचे वाटप करायला बसले आहेत काय?

भाजपची मैत्री स्वीकारणार नाही

भाजपकडून मैत्रीचा हात पुढे आल्यावर काय करणार?, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, आम्ही भाजपची मैत्री कधीच स्वीकारणार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला पक्ष भाजपने फोडला आहे. केवळ शिवसेनाच नव्हे तर महाराष्ट्राच्या काळजात घुसलेला हा बाण आहे. त्यामुळे भाजपशी मैत्री शक्य नाही. आज अनेक पक्षांमध्ये शिवसेनेने निर्माण केलेले नेते काम करत आहेत. शिवसेना नसती, बाळासाहेब ठाकरे नसते तर हे नेते कुठेच नसते.

नागालँडमध्ये राष्ट्रवादीची भाजपसोबत युती

नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपने मिळून सत्तास्थापनेसाठी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. यावर संजय राऊत म्हणाले, नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनेने भाजपसोबत युती केलेली नाही तर केवळ मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र आले आहेत. नागालँड हे सीमेवरील राज्य असल्याने देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे तेथे सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन विकास करणे, हे योग्यच आहे. यात काहीही चुकीचे नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकांसमोर ही भूमिका पोहोचवण्यात कमी पडत असावा.

संबंधित वृत्त

ठाकरे गटाचा घणाघाती हल्ला:अवकाळीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला, राज्य सरकार मात्र भांग ढोसून पडले

अवकाळीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. राज्य सरकार मात्र भांग ढोसून पडले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, महाराष्ट्रात धुलीवंदन उत्साहाची भांग सत्ताधाऱ्यांना जरा अतीच चढली होती. भांग पिऊन नाचण्यासाठी खास दिल्लीहून निमंत्रित बोलावले होते. धुलीवंदनाचा जलसा जुहूच्या पंचतारांकित हॉटेलात सुरू होता. त्याच वेळी महाराष्ट्राचा शेतकरी अवकाळी आणि गारपिटीने उद्ध्वस्त होत होता. हे चित्र विदारक आहे. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...