आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sanjay Raut Criticized Ed And Bjp Over Action Against Maharashtra Ministers Said Now Only ED And CBI Have To Investigate The Pickpocketing

राऊतांची फटकेबाजी:ED, CBI ने आता फक्त पाकिटमारांचा तपास करायचा बाकी, केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिष्ठा धुळीस; शिवसेना खासदारांचा चिमटा

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या महाविकास आघाडीतील मंत्री आणि नेत्यांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा सुरू आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आमदारकीविरोधात कोर्टात याचिका दाखल करणारे नागपूरचे वकिल सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. त्यावरूनच संजय राऊतांनी भाजप आणि तपास यंत्रणांना टोला लगावला आहे.

सतीश उके यांनी बेकायदेशीर कृत्य केले असेल, तर महाराष्ट्रातील पोलिस तपास करतील. यासाठी ईडीची गरज नाही. जाणूनबुजून ईडीला महाराष्ट्रात आणले जात आहे. अतिरेकी हल्ला करून निघून जातात, तशाच या देखील केंद्र सरकारकडून होणाऱ्या अतिरेकी कारवाया आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली असून आता फक्त रेल्वेमधील पाकिटमारांचा तपास ईडी आणि सीबीआयने करायचा बाकी आहे, असे म्हणत संजय राऊतांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

मोदी सरकार गेल्या 7 वर्षांपासून जनतेला 'एप्रिल फूल' करत आहे. महाराष्ट्र आणि देशात सुडाचं राजकारण करत नाही, हे सांगण देखील एप्रिल फूल आहे. केंद्र सरकारने जनतेला 'एप्रिल फूल' करत पेट्रोल-डिझेलचे भाव वाढवले आहेत. अच्छे दिन येणार, तुमच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होणार, दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार दिला जाणार आणि पाकव्याप्त काश्मीर भारतात येणार, या सगळ्या घोषणा म्हणजे 'एप्रिल फूल'च आहे.

आता सरकारने थापा मारण बंद करावे,' असे संजय राऊत म्हणाले. याशिवाय, मी पुन्हा येईन म्हणणंही एप्रिल फूलच आहे. पण मी आता जखमेवरील खपली काढू इच्छित नाही, असा टोला राऊतांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना यावेळी लगावला.

कारवाईविरोधात एकजूट व्हावं -
बीगरभाजप राज्यात ईडीच्या कारवाया होत आहेत. जर आशाच ईडीच्या कारवाया होत राहिल्या आणि संघर्ष निर्माण झाला, तर केंद्र आणि राज्यांमधील दरी वाढेल. केंद्र सरकारच्या या कारवाईविरोधात एकजूट होण्याचे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र पाठवले आहे. केंद्राकडून बिगर भाजपशासित राज्यांमध्ये ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर या सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. यामुळे सर्वांनी एकत्र आले पाहिजे, अशी ममता बॅनर्जींची भूमिका असल्याचे राऊत यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या गृहखात्याने कठोर भूमिका घ्यावी -
याशिवाय, संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्राच्या गृह खात्यावरचं आक्रमण करत असून गृह खात्याने अधिक सक्षम आणि कठोर होणे गरजेचे असल्याचे म्हटले. केंद्र सरकारच्या तपास यंत्रणाकडून होत असलेल्या कारवाईवर गृह खात्याने आस्ते कदम भूमिका जर घेतली तर ते स्वतःसाठी फाशीचा दोर ओढताहेत, असे संजय राऊत म्हणाले. गृहखात्याला आता दमदार पावलं टाकवी लागतील. नाहीतर तुम्ही स्वत:साठी रोज एक नवीन खड्डा खणाल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. यापूर्वीही ईडीच्या कारवाईवरून राऊतांनी भाजप आणि तपास यंत्रणांना टोला लगावला होता. मला भीती वाटते की आमच्या एखाद्या शिवसैनिकाची वडापावची गाडी असेल त्याच्यावर सुद्धा ईडी कारवाई करेल, असे संजय राऊत म्हणाले होते.

बातम्या आणखी आहेत...