आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबेईमानी आणि गद्दारीची बिजे साडेतीन वर्षांपासून सुरु होती. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही हा प्रकार सुरु होता. देखील हे लोक अहमद पटेलला भेटले होते. त्यांच्या बैठका देखील झाल्या होत्या. त्यांच्या डोक्यातला हा जो बेईमानीचा किडा आहे तो जुना आहे, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
अयोध्या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या 40 आमदारांसह लखनऊत दाखल झाले आहेत. शनिवारी रात्री लखनऊ विमानतळावर पोहोचताच ‘जय श्रीराम’चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात शिंदेसेनेचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांच्या या अयोध्या दौऱ्यावरुन खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना निशाणा साधला आहे.
रामाने कौल दिला नसता
संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्याबरोब जे लोक आहेत. त्यांना आम्हीच घेऊन गेलो होतो. तुम्हाला रामाची आठवण आत्ता झाली. जेव्हा तुम्ही सुरत-गुवाहाटीला जाण्याऐवजी तुम्ही अयोध्येला गेला असता तर प्रभु श्रीरामचंद्राला कौल लावला असता तर रामाने कधीच असत्याच्या बाजूने कौल दिला नसता.
प्रभु श्रीराम यांना सुबुद्धी देवो
संजय राऊत म्हणाले, आज तुम्ही भाजपसोबत अयोध्या गेलात याचा आनंदच आहे. मात्र गेल्या 72 तासांपासून राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकरी त्रस्त आहेत. अधिवेशनात काही घोषणा केल्या होत्या. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे सरकार धर्माच्या नावावर पर्यटनाला निघाले आहेत. हे ढोंग आहे. प्रभु श्रीरामाचा आशीर्वाद यांना मिळणार नाही. महाराष्ट्राचे प्रश्न वाऱ्यावर सोडून हे अयोध्येला गेले आहेत. तर प्रभु श्रीराम यांना सुबुद्धी देवो आणि राज्याला चांगले दिवस येवो.
शरद पवार ज्येष्ठ
संजय राऊत म्हणाले, सत्ता आहे तोपर्यंत टाळकुटेपणा असतो. खोटी डिग्री घेऊन पंतप्रधानांनी बसावे हे योग्य नाही. अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांची डिग्री कशी खोटी आहे हे समोर आणले. गौतम अदानी हे मोदींचे जीवश्च कंटश्च मित्र आहेत. त्यांच्यामुळेच अदानींची भरभराट. अनेक उद्योगपती आज जेलमध्ये आहेत. गौतम अदानी प्रकरणाची चौकशी व्हावी, सत्य लोकांच्या समोर यायला हवे. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. जेपीसी चौकशीवर तिन्ही पक्षांची मिळून मागणी आहे.
भाजप स्पॉन्सर्ड दौरा
संजय राऊत म्हणाले, बाबरीच्या वेळी भाजपचे लोक आमच्यासोबत आले नाही. आता गद्दारांसोबत गेले. महाराष्ट्रात आल्यावर पाहा सरकारचे काय होते. भाजपने स्पॉन्सर्ड केलेला हा दौरा आहे. ते आमची कॉपी करत आहेत. मात्र कोण खरे कोण खोटे हे जनतेला माहित आहे.
संबंधित वृत्त
हिंदुत्वाचा हुंकार:शिंदे, फडणवीस अयोध्येत दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत पोहोचताच शासकीय प्रोटोकॉलनुसार एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.