आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीकास्त्र:महाराष्ट्राला बदनाम करणारे लोक आता राजकारणात येत आहेत, हे तर अपेक्षितच होते - संजय राऊत

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुप्तेश्वर पांडे यांनी निवडणुकीसाठीच राजीनामा दिला आहे - राऊत

सुशांत प्रकरणामध्ये अनेकवेळा थेट मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित करणारे बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यांच्या निवृत्तीवरून शिवसेना खासदार संजय राऊत भाष्य केले आहे. जे लोक महाराष्ट्राला बदनाम करताहेत ते राजकारणात जात आहेत, अशी टीका राऊत यांनी केली. एबीपी माझा वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी निवडणुकीसाठीच राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा देणे सर्वांनाच अपेक्षित होते. राजीनामा देण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. महाराष्ट्राला बदनाम करणारे लोक आता राजकारणात येत आहेत. अशी टीका राऊत यांनी केली.

गुप्तेश्वर पांडे यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये अनेक वेळा महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. त्यांच्या वक्तव्यांमुळे ते चांगलेच चर्चेत होते.

गुप्तेश्वर बक्सरमधून निवडणूक लढू शकतात

सूत्रांच्या माहितीनुसार जेडीयू शहाबादमधील प्रभाव वाढवण्यासाठी डीजीपी पांडे यांना बक्सर शहरी सीट किंवा लागून असलेल्या कोणत्याही जागेवरुन विधानसभा निवडणूक लढवू शकते. असे मानले जाते की शहाबादमधील सासाराम, बक्सर, आरा लोकसभा जागा भाजपच्या ताब्यात आहेत. मात्र आता जेडीयूला या भागात स्वत: ला बळकट करायचे आहे. गुप्तेश्वर पांडे ब्राह्मण समाजातून आले आहेत. अशा परिस्थितीत दक्षिण बिहारमध्ये जेडीयू पांडे यांना ब्राह्मण नेता म्हणून सादर करू शकते. शहाबाद भागातही पांडेचा चांगलाच प्रभाव आहे. शहाबाद भागातील निवडणुकीत जेडीयू पांडे यांचा वापर करेल आणि त्यांना ब्राह्मण नेते म्हणून सादर करेल.

बातम्या आणखी आहेत...