आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रात सरकार नसून अंडरवर्ल्डप्रमाणे राज्य चालवले जात आहे. मुंबई, ठाण्यात ज्याप्रमाणे अंडरवर्ल्डच्या टोळ्यांनी आपापला परिसर वाटून घेतला होता, त्याप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टोळ्या राज्य चालवत आहेत, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
नारायण राणेंचे नाव घ्यायलाही लाज वाटते
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, नारायण राणे, एकनाथ शिंदे यांचे नाव घ्यायलाही लाज वाटते. स्वार्थासाठी त्यांनी स्वत:च्या आईला बदलले. अशा गद्दार लोकांना भाजप आता मांडीवर घेत आहे. नारायण राणे, एकनाथ शिंदे यांची समाजात, राजकारणात प्रतिष्ठा काय? देवेंद्र फडणवीस यांची तरी काय प्रतिष्ठा राहिली आहे.
फडणवीसांनी भ्रष्टाचाऱ्यांविरोधात काडतूस वापरावे
संजय राऊत म्हणाले, भाजप आमदार राहुल कुल, मंत्री दादा भुसे यांच्या भ्रष्टाचाराबाबत मी स्वत: ईडी, सीबीआय, मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यासह तक्रार दाखल केली आहे. तरीही त्यांच्यावर काहीच कारवाई केली जात नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात मी फडतूस नव्हे काडतूस आहे. त्यांनी हे काडतूस भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध वापरावे. मात्र, ते आपले काडतूस केवळ राजकीय विरोधकांवर वापरत आहेत. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही आपली प्रतिष्ठा गमावली आहे.
भाजपात आता 90 टक्के लोक बाहेरचे
दरम्यान, भाजपचा आज स्थापना दिवस आहे. त्यावरुनही संजय राऊतांनी भाजपवर सडकून टीका केली. संजय राऊत म्हणाले, देशात एकच पक्ष असावा, अशी भाजप नेतृत्वाची इच्छा आहे. त्याला हुकुमशाही म्हणतात. लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी यांचा भाजप वेगळा होता. आताचा भाजप पूर्ण वेगळा आहे. तेव्हा हुकुमशाहीविरोधात लढण्यासाठी भाजप हा जनता पक्षातही विलिन झाला होता. नंतर एक भूमिका घेऊन तो वेगळाही झाला. मात्र, आता भाजपात असलेल्या 90 टक्के लोकांचा त्या पक्षाशी काहीही संबंध नाही. बाहेरुन आलेली व वॉशिंग मशीनमध्ये धुतलेली ही सर्व फडकी आहेत.
सर्वोच्च न्यायालयात पुन्हा याचिका करणार
ईडी, सीबीआयच्या गैरवापराविरोधात विरोधी पक्षांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, याप्रकरणी आम्ही सर्वोच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल करणार आहे. आमची याचिका फेटाळली म्हणून भाजप का आनंदी होत आहे. आमची याचिका फेटाळताच भाजपचे लोक बँजो लावून का नाजत आहेत. आम्ही आता पुराव्यासह पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहोत.
हेही वाचा,
प्रत्युत्तर:आदित्य ठाकरेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी शाखाप्रमुख, सोन्याच्या चमचा घेऊन आलेल्यांना काय बोलणार?- एकनाथ शिंदे
आदित्य ठाकरेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी शाखाप्रमुख म्हणून काम करतोय. सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना आणि आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्यांना मी काय बोलणार? असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.