आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sanjay Raut Critizsize On Pm Modi And Amit Shaha | Doesn't The Central Government, Which Is Involved In ED Politics, See The Outrage Of Kashmiri Pandits?

संजय राऊतांचा सवाल:​​​​​​​ईडीच्या राजकारणात गुंतलेल्या केंद्र सरकारला काश्मिरी पंडितांचा आक्रोश दिसत नाही का?

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू काश्मीरात 370 कलम लागू केले आहे. हा केंद्रशासित प्रदेश झाला तरीही तिथे काही फरक पडलेला नाही. काश्मीर पंडित रस्त्यांवर उतरलेले आहेत. सामुदायिक स्थलांतर करण्यासंदर्भात त्यांनी सरकारला इशारे दिले आहेत. तरीही केवळ ईडीच्या राजकारणात गुंतलेल्या केंद्र सरकारला काश्मिरी पंडितांचा आक्रोश दिसत नाही का?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी विचारला आहे.

केंद्रातले सरकार हे प्रखर हिंदुत्ववादी आहे. काश्मिरी पंडितांच्या घरवापसी बाबत आग्रही असलेले हे सरकार आहे. नोटबंदीनंतर काश्मीरात दशहतवाद संपूर्णपणे संपेल असे वचन केंद्र सरकारने दिले होते. मात्र, तिथे काश्मीरी पंडित, जवान, मुस्लिम पोलिस अधिकारी ठार मारले जात आहे. जे या देशाची सेवा करत आहे, त्यांचे रक्षण केंद्र सरकार करू शकत नाही, असे म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र केले.

देशाचे गृहमंत्री, पंतप्रधान मोदी हे फक्त निवडणुका आणि राजकारण यात गुंतून पडले आहेत. त्यांनी देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेकडे, काश्मिरमधल्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे. मात्र, दुर्दैवाने ते फक्त राजकारण करत असून विरोधकांवर ईडी, सीबीआयसारखे हल्ले करत आहे. ईडीमध्ये गुंतलेल्या सरकारला काश्मिरी पंडितांचे आक्रोश दिसत नाही हे या देशाचे आणि देशातल्या हिंदुंचे दुर्दैव आहे, असे म्हणत राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली.

भाजपकडे दुर्बिणी नेते

दुर्बिणी नेते काय-काय बघता ते पाहावे लागेल, त्यांच्याकडे दुर्बिणी आहेत म्हणूनच ते बाबरी पडत असताना पळुन गेले आणि शिवसैनिकांनी ती पाडली. अशा प्रकारचे सत्य कथन भाजपच्या नेत्यांच्या तोंडूनच बाहेर पडले आहे. अशा पळपुट्यांनी आमच्याकडे दुर्बिणी लावू नये, असे म्हणत राऊतांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीकास्त्र सोडले.

हार्दिक पटेल बळी पडले

राऊतांनी हार्दिक पटेल यांच्यावरही भाष्य केले. ते म्हणाले की, त्यांनी आपल्या स्वत:च्या भूमिका तपासून पाहायला हव्यात. देशद्रोही या शब्दाची व्याख्या भारतीय जनता पक्षाने हार्दिक पटेलसाठी केली होती. खोट्या केसेस, सत्तेचा गैरवापर, त्याच्या माध्यमातून हार्दिक पटेल सारख्या नेत्यांवर दबाव आणले जातात, हार्दिक पटेल देखील याचा बळी आहे, असे राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...