आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sanjay Raut Critzsize On Bjp | Cm Uddhav Thackeray Meeting Aurangabad | He Said That The Mouth Of The Opposition Is Not A Mouth But A Gutter

संजय राऊतांचा हल्लाबोल:म्हणाले- विरोधकांचं तोंड नसून गटार, मुख्यमंत्र्यांच्या सभेला लाखो शिवसैनिक येणार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेआधी भाजपकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. त्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका आहे. ते म्हणाले की, "विरोधकांचे तोंड नसुन ते गटार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी काय बोलावे, कसे बोलावे, याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांसोबत त्यांचा वैयक्तिक द्वेष असू शकतो, पण अशा प्रकारे त्यांच्या तोंडातून विझलेले फटाके फुटत असतील तर त्याची पर्वा आम्ही करत नाही" अशी टीका संजय राऊतांनी भाजपवर केली आहे.

आज औरंगाबादमध्ये संध्याकाळी सहा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर राऊत मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत होते. ते म्हणाले की, मराठवाड्यामध्ये 37 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या शिवसेनेच्या शाखेचा आज औरंगाबादमध्ये वर्धापनदिन आहे. त्यानिमित्त एक भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या सभेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहत आहेत. सभेची तयारी गेल्या काही दिवसांपासून जोरात सुरू होती. संपूर्ण मराठवाड्यातून लाखो शिवसैनिक सभेसाठी येणार आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

सभेची उत्सुकता

बऱ्याच दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईच्या बाहेर सभा घेत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये याचे आकर्षण आहे. देशात आणि राज्यात सध्या काय घडतय त्यावर उद्धव ठाकरे हे भाष्य करणार आहेत. आज संध्याकाळी मुख्यमंत्री सभेसाठी पोहोचतील आणि भव्य सभेला संबोधित करतील, अशी माहिती राऊतांनी दिली आहे.

बच्चू कडू आमच्याबरोबर

पुढे राऊतांनी बच्चू कडू यांनी राज्यसभेसाठी घेतलेल्या वक्तव्यावरुन भाष्य केले. बच्चू कडू यांनी राज्यसभेच्या मतदानाच्या शेवटच्या पाच मिनीटात निर्णय घेऊ असा इशारा सरकारला दिला आहे. त्यावर राऊत म्हणाले की, "सरकार स्थापन करताना, जे घटक पक्ष आमच्याबरोबर होते ते सगळे आजही आमच्याबरोबर आहेत. कालच शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे की, सरकारमध्ये काही लहान सहान गोष्टी राहिल्या असतील तर त्याला ताबडतोब पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू, अशा सूचना दिलेल्या आहेत. महाविकास आघाडीतला प्रत्येक घटक पक्ष हा आजही आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये देखील महाविकास आघाडीमध्ये आहे. त्या पक्षांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास देखील व्यक्त केला आहे." असे म्हणत राऊतांनी बच्चू कडू आपल्यासोबतच असल्याचे म्हटले आहे.

10 तारखेला कळेल

10 तारखेला कळेल की कोणता पक्ष कोणासोबत आहे. त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत आमची चर्चा झाली आहे. शेवटी महाराष्ट्राची सरकार हे कॉमन मिनीमन प्रोग्रामवर आलेले आहे. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांनी राज्याचा विकासाचा एक आराखडा तयार केला आहे. त्यानुसारच हे सरकार चालणार आहे. असे राऊत म्हणाले.

मनसेला अॅलेर्जी आहे का?

शिवसेनेला अजूनही हिंदुत्वासाठी बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो वापरावा लागतो आहे. असे टीका मनसेने शिवसेनेवर केली होती. त्यावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, "फोटो बाळासाहेबांचा नाही तर कोणाचा लावायचा. त्यांना बाळासाहेबांच्या फोटोची अॅलेर्जी आहे का? तुम्ही देखील सुरुवातीच्या काळात त्यांचाच फोटो लावत होता, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे राऊत म्हणाले.

ठाकूरांचा आग्रह योग्य

सत्ता स्थापन होत असताना बहुजन विकास आघाडी महाविकास आघाडीसोबत होती. पंरतु काल बैठकीत हितेंद्र ठाकूर यांना कोणत्याही प्रकारचे आमंत्रण दिले गेलेले नाही. त्यावर राऊत म्हणाले की, " हितेंद्र ठाकूर हे आमच्या कुंटुबातील आहेत. हितेंद्र ठाकूर यांचे सर्व सहकारी आमच्या संपर्कात असून, त्यांच्याशी आम्ही संपर्क करत आहोत. ठाकूर यांचा आग्रह नेहमी त्यांच्या भागातील विकास कामासाठी असतो. त्यांचा आग्रह योग्य आहे." असे राऊत म्हणाले.

देसाईंचा पत्ता कट?

विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून मंगळवारी पाडवी आणि आहिर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर सुभाष देसाई यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा होती. त्यावर देखील राऊतांनी भाष्य केले. ते म्हणाले की, "पत्ता कट हा शब्द चुकीचा आहे. सुभाष देसाई, दिवाकर रावते हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी पक्षासाठी वर्षानुवर्ष काम केले. अनेक वर्ष ते सरकारमध्ये देखील होते. त्यामुळे त्यांच्याविषयी असे बोलणे योग्य नाही. पक्षाचे काही निर्णय असू शकतात, त्या निर्णयाच्या प्रवाहात हे दोन्ही प्रमुख नेते निम्मे सहभागी असतील. पक्ष त्यांना वेगळी जबाबदारी देणार" असा खुलासा राऊतांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...