आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Mumbai
 • Sanjay Raut Ed Arrested | Sanjay Raurt Latest Update | Ed Enquiry Sanjay Raut | The Lawyer Will Come To The ED Office To Meet Him, After Which The Interrogation Will Begin At 9.30

राऊतांचा ED च्या कोठडीतील 2रा दिवस:ईडीसमोर चार दिवसांत राऊतांविरोधातले प्रबळ पुरावे करण्याचे आव्हान

मुंबई15 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

एक हजार कोटींहून अधिक रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मुंबईत आणखी दोन छापे टाकले आहेत. मात्र, हा छापा कुठे सुरू आहे, याची माहिती ईडीने दिलेली नाही. ईडीशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, राऊत यांच्या दोन जवळच्या नातेवाईकांवर ही कारवाई करण्यात येत आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अटकेनंतर सोमवारी चार ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आज संजय राऊतांची ईडीसमोर चौकशी होत आहेत, याचदरम्यान आज सकाळी राऊत यांच्या वकीलांनी त्यांची भेट घेतली. राऊतांच्या चौकशीदरम्यान वकिलांना काही अंतरावर थांबण्याची मुभाही न्यायालयाने दिली आहे.

संजय राऊत यांना न्यायालयाने सोमवारी चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली. त्यामुळे आता ईडीसमोर चार दिवसांत राऊतांविरोधातले प्रबळ पुरावे करण्याचे आव्हान आहे. राऊतांना आठ दिवसांची रिमांड मिळावी अशी मागणी ईडीने न्यायालयात केली होती. तर संजय राऊत यांच्याकडे सर्व पैसा हा वैध मार्गांने आला आहे, त्यांच्यावर खोटी केस दाखल करण्यात आली आहे, तसेच संजय राऊत हे हार्ट पेशंट आहेत त्यामुळे त्यांना कमी दिवसांची रिमांड द्यावी अशी मागणी संजय राऊत यांच्या वकिलाने न्यायालयात केली होती.

2024 पर्यंत देशात असेच चालणार : फक्त 11 लाखांसाठी त्रास दिला जातोय; संजय राऊतांच्या अटकेवर खासदार जया बच्चन यांची प्रतिक्रिया

न्यायालयात युक्तीवाद

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचा थेट संबंध असून प्रविण राऊत यांच्या माध्यमातून त्यांनी पैसा मिळवला असल्याचा आरोप ईडीने केला आहे. तसेच या प्रकरणात संजय राऊत यांनी दोन साक्षीदारांना धमकावल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले. संजय राऊत यांना जर सोडले तर ते पुन्हा तशा प्रकारचे कृत्य करू शकतात, त्यामुळे त्यांना आठ दिवसांची रिमांड देण्यात यावी अशी मागणी ईडीकडून करण्यात आली होती.

पत्राचाळीच्या ‘एफएसआय’चा घोटाळा

 • विकलेल्या 1034 कोटींच्या एफएसआयचा हिशोब संजय राऊतांना द्यावा लागणार आहे.
 • प्रवीण राऊत, गुरू आशिषचे माजी संचालक
 • पत्राचाळ : 2006 मध्ये म्हाडा, गुरू आशिष बिल्डर आणि भाडेकरूंमध्ये करार झाला.
 • गुरू आशिष : 2007 मध्ये प्रवीण राऊत गुरू आशिषचा संचालक
 • प्रवीण राऊत : 1034 कोटींच्या एफएसआयच्या बेकायदा विक्रीचा ईडीकडून ठपका. आता कंपनीचा संचालक म्हणून प्रवीण राऊत सध्या ईडीच्या कोठडीमध्ये आहे.
 • माधुरी राऊत : प्रवीण राऊत यांची पत्नी - वर्षा राऊत : संजय राऊत यांची पत्नी (या दोघी सिद्धांत सिस्कॉन प्रा.लि कंपनीत भागीदार)
 • संजय राऊत : प्रवीण राऊतांकडून वर्षा राऊतांच्या खात्यावर 1 कोटी 60 लाख जमा झाल्याचा ईडीचा आरोप. यातून अलिबागमध्ये प्लॉट घेतल्याचा दावा केला आहे.
 • ईडी : प्रवीण हा संजय राऊतांचा ‘फ्रंटमॅन’ असल्याचा आरोप करत 1034 कोटींच्या घोटाळ्याचा त्यांच्यावर ईडीकडून ठपका.

पत्राचाळीच्या ‘एफएसआय’चा घोटाळा

सिद्धार्थनगरात 47 एकरांवरील पत्राचाळीच्या विकसनासाठी म्हाडाने 2006 मध्ये राकेश व सारंग वाधवान यांच्या गुरू आशिष कंपनीशी करार केला. 20 मार्च 2007 रोजी प्रवीण राऊत कंपनीचा तिसरा संचालक बनला. 2008 पर्यंत घरे न दिल्याने भाडेकरूंची म्हाडाकडे तक्रार. 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांनी तपासाचे आदेश दिले. 2016 मध्ये कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाला. गुरू आशिषने 1034 कोटींचा एफएसआय अन्य बिल्डर्सना अवैधपणे विकल्याचे पुढे आले. संचालक म्हणून प्रवीण राऊत ईडीच्या कोठडीत. प्रवीणने संजय राऊतच्या पत्नी वर्षा यांना घर खरेदीसाठी दिलेले 55 लाख का व कशासाठी दिले, ते कोठून आले या प्रश्नापासून सुरू झालेला हा तपास आता 1034 कोटींवर आला आहे.

बातम्या आणखी आहेत...