आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राऊतांच्या मागे ईडी:संजय राऊतांना ईडीच्या कारवाईची पूर्वकल्पना होती, म्हणून त्यांनी 55 लाख परत केले- किरीट सोमय्या

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने मोठा दणका दिला असून, ईडीकडून त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यात ईडीने संजय राऊत यांचे दादरमधील राहते घर आणि अलिबागमधील 8 भूखंड जप्त केले आहे. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केले आहे. संजय राऊतांना ईडीच्या कारवाईची पूर्वकल्पना होती, पूर्वकल्पना असल्याने त्यांनी 55 लाख रुपये परत केले. ईडी कारवाई करणार होती, त्यामुळे राऊतांचा खटाटोप सुरू होता. असे भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले.

पुढे सोमय्या म्हणाले की, पोलिसांचा माफिया म्हणून वापर करुन कारवाई टाळता येणार नाही. 1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. घोटाळ्यात संजय राऊतांचा नेमका काय रोल आहे याची चौकशी व्हावी. अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. मी ईडीला आणि आयकर विभागाला त्या अनुषंगाने चौकशी करण्याची विनंती केली. संजय राऊत यांनी 55 लाख परत करुन स्वत:ची चोरी कबूल केली. असे देखील सोमय्या म्हणाले.

पुढे सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना जाब विचारायला हवा. राज्याच्या गृहमंत्र्याने देखील ईडीकडून या प्रकरणाची माहिती घेतली पाहिजे. ठाकरे सरकार पोलिसांना माफिया म्हणून वापरणार असेल तर त्याचा आपण निषेध करतो. मुख्यमंत्र्यांनी संजय राऊतांना एकदाही प्रश्न विचारला नाही? प्रवीण राऊतांना जामीन न मिळूनही संजय राऊतांना जाब विचारला नाही. ईडी त्याचे काम करत असून, ठाकरे परिवाराचे आर्थिक गैरव्यवहार देखील समोर येणारच. असा इशारा सोमय्यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...