आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राने मदत करावी:महाराष्ट्र संकटात, कोकणासह अनेक भागांत घरे उद्धवस्त; केंद्र सरकारने सढळ हातांनी तातडीने मदत करावी, संजय राऊत यांचे आवाहन

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील अतीवृष्टी आणि पूर परिस्थितीत केंद्राने तातडीने मदत करावी असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह समस्त महाराष्ट्र संकटात आहे. रायगड, सिंधूदुर्ग आणि रत्नागिरी भागांमध्ये पूर आला आहे. अशात केंद्राच्या तिजोरीत सर्वाधिक पैसा टाकणाऱ्या महाराष्ट्राला केंद्राने सढळ हातांनी मदत कारावी असे राऊत यांनी शिवसेनाच्या मुखपत्रातून म्हटले आहे.

सढळ हातांनी मदत कारावी

संजय राऊत म्हणाले, की केंद्राच्या तिजोरीत सर्वाधिक पैसा टाकणाऱ्या महाराष्ट्राचे हे संकट केंद्राने देशावरील संकट समजावे. तसेच पीएम नरेंद्र मोदींनी सढळ हातांनी महाराष्ट्राला मदत करावी ही मराठी जनतेची अपेक्षा आहे. महाराष्ट्रावर एकूणच पुन्हा आसमानी संकट बरसले आहे. अशा पिरस्थितीत कुठल्याही प्रकारचे राजकीय आखाडे करू नये.

सरकार काय करत आहे? इतका पाउस पडत असताना सरकार झोपले होते काय? सरकारची मदत का पोहोचली नाही? असे प्रश्न कुणाला विचारायचे असतील तर थोडीशी कळ काढावी असेही राऊत यांनी विरोधकांना सुनावले आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावा-गावांना जोडणारे रस्ते आणि पुल सुद्धा वाहून गेले. केंद्र सरकारने या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून मदत करावी असेही शिवसेनेने म्हटले आहे.

महाराष्ट्र संकटात

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू आहे. कोकणमध्ये याचा सर्वाधिक फटका बसला असून लोकांची घरे वाहून गेली आहेत. अनेक ठिकाणी घरांमध्ये सुद्धा पाणी शिरले आहे. केवळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच नाही तर विदर्भ आणि मराठवाड्यात सुद्धा अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. अनेक नद्यांनी रौद्र रूप धारण केले. एकूणच संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने भीषण परिस्थिती निर्माण केली आहे.

बातम्या आणखी आहेत...