आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप VS शिवसेना:बाबरी प्रकरणी संजय राऊतांकडून देवेंद्र फडणवीसांना सामनाचे कात्रण ट्विट करत प्रत्युत्तर

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. बाबरी पाडली, तेव्हा मी तिथेच होतो, मात्र शिवसेनेचे कोणी नव्हते असे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यावरुन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तर संजय राऊतांनी ट्विट करत त्यावेळीच्या दैनिक सामनासह काही दैनिकाचे कात्रण शेअर केले आहेत .

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचे एक कात्रण आणि अन्य काही वृत्तपत्रातील कात्रणे टविट केले आहे. आणि आता बोला असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. सकाळीच बोलताना संजय राऊत यांनी भाजपचे नेते सुंदरसिंह भंडारी यांना विचारावे की बाबरीच्यावेळी शिवसेना कुठे होती असे म्हटले आहे.

सीबीआयचा अहवाल तपासा - संजय राऊत

त्याकाळात या प्रकरणी सीबीआय तपास झाला होता तो तपासा. शिवसेना कुठे आहे असे विचारणाऱ्या अज्ञानांना शिवसेना कुठे होती आणि काय करत होती हे कळेलच, अशा शब्दांत संजय राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. तर काल औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी भोंग्यावरुन राज्य सरकारला इशारा दिला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, भोंग्याचा विषय हा कायद्याच्या चौकटीतील आहे. भोंग्याचा मुद्दा काढून मुळ विषयाला बाजूला ठेवण्याचे काम चालू आहे. हे काम काही लोकांकडून भाजप करत असल्याची टीका राऊत यांनी केली.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
भाजपच्या मुंबईतील सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवसेनेत मशिदीवरील भोंगे उतरवण्याची हिम्मत नाही आणि म्हणतात बाबरी आम्ही पाडली अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याचबरोबर बाबरी पाडल्यानंतर सर्व आरोपी हे भाजपचेच होते शिवसेनेचा एकही कार्यकर्ता बाबरी पाडण्यासाठी गेला नव्हता असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावर बोलताना संजय राऊतांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

बातम्या आणखी आहेत...