आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

टीकास्त्र:'नया है वह' वरून संजय राऊतांचा भाजपवर पलटवार, म्हणाले - मोदी-शाह दिल्लीत तर फडणवीस महाराष्ट्रात नवेच

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदी दिल्लीत नवे होते, त्यांनी चांगले काम केले, त्यांना आम्ही नया है वह म्हटलं का? : राऊतांचा सवाल
Advertisement
Advertisement

‘नया है वह’ म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टिप्पणी केली होती. यावर नरेंद्र मोदी-अमित शाह हे दिल्लीत, तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात नवेच आहेत, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधीपक्ष नेते फडणवीसांवर पलटवार केला. 

मोदी दिल्लीत नवे होते, त्यांनी चांगले काम केले, त्यांना आम्ही नया है वह म्हटलं का? 

राऊत म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस जुने कुठे झाले, ते देखील नवेच आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही तरुणांना संधी द्यावी या मताचे आहेत. तसेच अमित शाह हे देखील दिल्लीच्या राजकारणात नवीनच आहेत. मात्र त्यांनी गृहमंत्री म्हणून दिल्लीत उत्तम काम केले आहे. मोदीही दिल्लीत नवे होते, त्यांनी देखील उत्तम काम केले, त्याचे आम्ही कौतुक करतोच की. त्यांना आम्ही नया है वह म्हटलं का? असा सवाल राऊतांनी केला. आदित्य ठाकरे हे मंत्री म्हणून चांगले काम करत आहेत, असेही राऊत म्हणाले. 

काय म्हणाले होते फडणवीस?

विरोधी पक्ष ‘हेल्थ आणि डिझास्टर टुरिझजम’मध्ये व्यस्त असल्याची टीका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर टीप्पणी केली होती. फडणवीस म्हणाले होते की, ''नया है वह! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे योग्य वाटतात त्यांना मंत्री बनवत आहेत. पण मंत्री बनवल्याने शहाणपण येतंच, असं नाही. त्यामुळे ठीक आहे. ते नवीन आहेत, बोलत आहेत. मला असे वाटते, माझ्यासारख्या माणसाने त्यावर फार काही प्रतिक्रियादेखील देऊ नये'', 

Advertisement
0