आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राऊतांची रोखठोक भूमिका:संजय राऊतांना मुंबई पोलिसांवरच संशय, म्हणाले -  बिहारप्रमाणे काही 'गुप्तेश्वर पांडे' महाराष्ट्र पोलिसांत असल्याने अडचणी वाढल्या, सांगितल्या 'या' चुका

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय राऊत म्हणतात मुंबई पोलिसांचे 'हे' चुकलेच

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाली. आता त्यांचे प्रकरण रोज वेगवेगळे वळण घेत आहे. सध्या यावरुन जोरदार राजकारणही सुरू आहे. सुशांत प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करत असताना हा तपास सीबीआयकडे देण्यात आला हे शिवसेनेला काही रुचलेले नाही. अशात आता शिवसेना खासदार संजय राऊतांनी स्वतः मुंबई पोलिसांवरच संशय घेतल्याचे दिसत आहे.

'बिहारप्रमाणे काही 'गुप्तेश्वर पांडे' महाराष्ट्र पोलिसांत असल्याने अडचणीत भर पडली हे माझे अनुमान आहे' असे बोलून त्यांनी मुंबई पोलिसांवरच संशय घेतला आहे. सामनाच्या 'रोखठोक'मध्ये त्यांनी हे भाष्य केले आहे.

राऊत म्हणाले की, 'या प्रकरणात ज्या बॉलीवूड कलाकारांची नावे येत आहेत त्यातील बहुतेक ‘डी’ ग्रेड मंडळी आहेत. अनेक वर्षे ती पडद्यावर दिसत नाहीत व इतर व्यवसाय करून ते जगत आहेत. यातील काही लोकांचा आदित्य ठाकरे यांच्याशी संपर्क आला म्हणून जे कुणी जमिनीवर काठ्या आपटत असतील तर ते चुकीचे आहे. या प्रकरणात सरकारविरोधी पक्षाने महाराष्ट्रापेक्षा बिहार पोलिसांची बाजू घेणे हा प्रकार धक्कादायक आहे. बिहारप्रमाणे काही गुप्तेश्वर पांडे महाराष्ट्र पोलिसांत आहेत व त्यांच्यामुळे अडचणीत भर पडली हे माझे अनुमान आहे.' असे म्हणत त्यांनी मुंबई पोलिसांवरच संशय घेतल्याचे दिसतेय.

संजय राऊत म्हणतात मुंबई पोलिसांचे 'हे' चुकलेच

  • मुंबई पोलिसांनी हा तपास नको तितका जास्त खेचला. सिनेसृष्टीतील सेलिब्रिटीज्ना रोज चौकशीला बोलवायचे व ‘गॉसिप’ला वाव द्यायचा. या प्रकरणाचा वापर सिनेसृष्टीत दहशत निर्माण करण्यासाठी झाला काय ते पाहायला हवे.
  • हे प्रकरण ‘हाय प्रोफाईल’ होत आहे असे दिसून येताच मुंबई पोलिसांतर्फे एक दिवसाआड तपासाबाबत माहिती पत्रकारांसाठी जाहीर करायला हरकत नव्हती. यात कुणी मंत्री किंवा राजकीय व्यक्ती असेल तर पोलीस त्याचेही स्टेटमेंट घेतील, असे सुरुवातीलाच सांगायला हरकत नव्हती.

गुप्तेश्वर पांडेविषयी राऊत म्हणतात...
बिहार पोलिसांची दोन पथके मुंबईत सुशांतसिंह मृत्युची चौकशी करण्यासाठी आली. त्यापैकी एका पथकाला मुंबई पालिकेने ‘कोरोना’ कायद्याने क्वारंटाईन केले. बिहार पोलिसांचे क्वारंटाईन हे पालिकेने केले. त्यावर राजकारण का व्हावे? बिहारचे राज्य पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे हे मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी वृत्तवाहिन्यांवर खाकी वर्दीत जाऊन तावातावात बोलतात. अर्णब गोस्वामी यांच्या वृत्तवाहिनीवरील चर्चेत ते सहभागी होतात. हा सरळसरळ पोलिसी शिस्तभंग आहे.

बातम्या आणखी आहेत...