आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sanjay Raut Interview; Uddhav Thackeray Narendra Modi Meeting | Shiv Sena Rajya Sabha Member And Saamana Editor Sanjay Raut On Congress And Lok Sabha Elections

संजय राउत Exclusive:राज्य आणि केंद्राच्या भांडणात नुकसान नेहमी जनतेचेच होते, त्यामुळे दोघांनी चर्चा करायलाच हवी; तर काँग्रेसला एकट्याने मोदींचा सामना करायचा असेल तर त्यांचा आत्मविश्वास मोडणार नाही- संजय राउत

संध्या द्विवेदी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरून शिवसेना राष्ट्रीय राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. अशात केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेनेची नेमकी भूमिका काय याचा खुलासा खासदार आणि शिवसेना मुखपत्र सामनाचे संपाद संजय राउत यांनी केला आहे. भास्कर प्रतिनिधी संध्या द्विवेदी यांनी घेतलेल्या एक्सक्लूसिव्ह मुलाखतीमध्ये संजय राउत यांनी काँग्रेस आणि केंद्र सरकारसह अनेक पैलूंवर प्रकाश टाकला आहे.

मुख्यमंत्र्यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली त्या भेटीचा अर्थ काय? नवीन राजकीय समिकरणे तयार होत आहेत का?
राजकारण आपल्या जागी आणि संबंध आपल्या जागी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आमचे जुने आणि भावनिक संबंध आहेत. त्यांच्याशी राजकीय संबंध तुटले तरी वैयक्तिक संबंध तुटणार नाहीत. कुठल्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांची भेट घेत राहावी. केंद्रासोबत मजबूत संबंध ठेवणे ही महाराष्ट्राची परमपरा आहे.

रजकारणात अनेक मुद्द्यांवर राज्यांना केंद्राची गरज पडते. त्यामुळे, या भेटीचा अर्थ काढणे योग्य ठरणार नाही. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आणि त्यांना भेट घ्यायला हवी मी एवढेच म्हणेल.

तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले, याचा राजकीय अर्थ काय की हे तुमचे वैयक्तिक विचार होते?
पंतप्रधान एखाद्या राजकीय पक्षाचे नसतात. पंतप्रधान एक घटनात्मक पद आहे. या पदाचा आदर बाळगायला हवा. पंतप्रधानांसोबत चर्चा करणे, त्यांची भेट घेणे गर्वेची बाब आहे. मी त्यांचे अनेकदा कौतुक केले आहे. आमचे हल्ले केवळ धोरणांवर असतात त्यांच्यावर वैयक्तिक नाही.

कोरोना काळा अनेक राज्यांनी बिगर केंद्राने भाजपशासित आणि इतर राज्यांवर भेदभाव केल्याचे आरोप केले. महाराष्ट्रासोबत तसे झाले का, केंद्राकडून आवश्यक मदत मिळाली का?
केंद्राने कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात काही चुका केल्या. सुप्रीम कोर्टाने देखील म्हटले आहे. परंतु, नंतर चुका सुधारल्या किंवा सुधारणांच्या दिशेने वाटचाल केली असे म्हणता येईल. महाराष्ट्राला मदतीचा मुद्दा उपस्थित केल्यास राज्याला केंद्राकडून हवी तेवढी मदत मिळाली नाही. आमचे जीएसटीचे पैसे अद्याप आलेले नाहीत. नुकत्याच झालेल्या पीएम मोदींसोबतच्या भेटीत यावर चर्चा झाली. जवळपास 30 हजार कोटी रुपये वेळेवर मिळाले असते तर कोरोना काळात खूप मोठी मदत ठरली असती. तरीही प्रश्न राज्याचा विकास आणि जनतेचाच आहे. केंद्र सरकार आणि पंतप्रधान सर्वांचे आहेत. राज्यांची मदत करणे ही केंद्राची जबाबदारी आहे. राज्यांना अधिकार आहे की त्यांनी केंद्राकडून मदत मागावी.

पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मोदींच्या बैठकांचा बहिष्कार करत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सुद्धा पंतप्रधानांना धारेवर धरतात. केंद्राकडून मदत मिळत नसेल तर मोकळेपणाने विरोध करण्यात हरकत काय?
मी हरकत आहे असे कधीच म्हटलो नाही. मी तर फक्त एवढे म्हणतोय, की केंद्र आणि राज्यांमध्ये समतोल गाठण्याचा प्रयत्न करावा. कारण, राज्य आणि केंद्र सरकारच्या वादात नुकसान नेहमीच जनतेचे होत असते. त्यासाठी ही वेळ अनुकूल नाही. वेळ व्यर्थ घालवणे योग्य नाही. केंद्राची चर्चा करून राज्यांना सुरक्षित करणे हेच आमचे प्राधान्य आहे. बाकी राज्य काय करतात त्यावर मी भाष्य करणार नाही.

शरद पवार आणि निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांच्या बैठकीत दीर्घकाळ चर्चा झाली. यात नेमके काय शिजतेय?
शरद पवारांना मी अगदी जवळून ओळखतो. ज्यांच्याकडून आपल्याला थोडी माहिती मिळेल अशा प्रत्येक व्यक्तीची पवार भेट घेतात. प्रशांत किशोर एक प्रतिभावंत व्यक्तिमत्व आहे. ते एखाद्या राजकीय पक्षाचे प्रमुख नाहीत. ते निवडणुकीची व्यूहरचना आखणाऱ्या कंपनीचे प्रमुख आहेत. अनेक राज्यांमध्ये त्यांना यश मिळाले. काही शिजतेय असे मला तरी वाटत नाही. पवार राजकीय नेते आहेत. राजकारणात आलेला बदल आणि नव्या प्रवाहांवर ते विचार करत असतात. या भेटीत असेच काही घडले असेल.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष एक होतील का? राज ठाकरेंना एका मुलाखतीत हा प्रश्न केला तेव्हा त्यांनी गॉड नोज (देव जाणे) असे उत्तर दिले होते?
भगवान काही खासदार किंवा राजकीय पक्षाचे नेते नाहीत की दोन पक्षांमध्ये चर्चा घडवून आणतील. मला वाटत नाही की असे कधी होईल. राज्यात अनेक राजकीय पक्ष असतात. त्यांना सुद्धा हक्क आहे की राज्यात राजकारण करावे.

काँग्रेस पक्षाकडून म्हटले जात आहे की ते महाराष्ट्रातील स्थानिक आणि लोकसभा निवडणूक सुद्धा स्वबळावर लढवणार आहेत. असे का?
काँग्रेस वाटत असेल की ते स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवून मोदींचा सामना करू शकतील तर मी त्यांचा आत्मविश्वास दुखावणार नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी आपला आत्मविश्वास असाच ठेवावा. पण, पश्चिम बंगाल, केरळ आणि आसामच्या निकालांचे एकदा मूल्यमापन करणे गरजेचे आहे. महाराष्ट्राबद्दल बोलावयाचे झाल्यास उद्धव ठाकरे पूर्ण कार्यकाळापर्यंत मुख्यमंत्री पदावर राहतील.

सामनाच्या संपादकीयमध्ये नुकतेच राज्यांच्या निकालावरून काँग्रेसला मंथन करण्याचा सल्ला दिला होता. सामनाने कधी आपल्या पक्षावर टीका केली का?
नक्कीच. सामना यासाठीच ओळखले जाते की यात मनातले लिहिलेले असते. आम्हाला जे योग्य वाटते ते आम्ही लिहितो. तुम्ही सामनाचे अंक चाचपून पाहिल्यास तुम्हाला मिळेल की आम्ही आमच्या नेत्यांवर सुद्धा टीका आणि सल्ले दिलेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...