आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sanjay Raut Jail | Raut Goregaon Patrachal Case | ED Directed To Reply On Sanjay Raut Bail Application By September 16, After Which Hearing Will Be Held

संजय राऊतांची जामिनासाठी धाव:पीएमएलए कोर्टात अर्ज; ईडीला 16 सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश, त्यानंतर होणार सुनावणी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पत्राचाळ घोटाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांनी जामिनीसाठी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता होती. मात्र, त्याआधी सत्र न्यायालयाने ईडीला राऊतांच्या जामीन अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

ईडीने मनी लॉंड्रिंग प्रकरणी राऊत यांना अटक केली असून, गेल्या काही दिवसांपासून ते कोठडीत आहेत. जामिनासाठी त्यांनी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज दाखल केला आहे. यावर आज सुनावणी होण्याची शक्यता होती. मुंबई सत्र न्यायालयाने ईडीला संजय राऊतांच्या जामीन अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

त्याच दिवशी सुनावणी

गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊत अडचणीत सापडले असून, ईडी मनी लॉंड्रिंगच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. सध्या ते मुंबईतील आर्थर रोड कारागृहात असून त्यांना 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी न्यायालयाने 16 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. तसेच, याच दिवशी राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता असल्याचेही सांगितले जात आहे.

राऊतांना अटक

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांना ईडीने 31 जुलैला अटक केली होती. त्यांनतर त्यांना विशेष न्यायालयाने आठ दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. नंतर मात्र, त्यांच्या पुन्हा 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर संजय राऊतांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती.

आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांना घरचे जेवण आणि औषधी पुरवण्याची मुभा देण्यात आली. त्यानंतर पुन्हा त्यांना 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 5 सप्टेंबर रोजी संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी संपली असून त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. संजय राऊतांचा कारागृहातील मुक्काम वाढला असून न्यायालयाने त्यांना 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

काय आहे पत्राचाळ प्रकरण?

गोरेगावमध्ये गुरुआशिष कंपनीला चाळीच्या पुनर्विकासाचे काम देण्यात आले होते. कंपनीशी संबंधित प्रवीण राऊत यांनी या जागेतील एफएसआय परस्पर विकल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थनगर भागातील या झोपडपट्टीचे काम न करताच परस्पर काही वर्षांपूर्वी येथील एफएसआय बेकायदेशीररित्या विकण्यात आला. यात जवळपास 1 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. तसेच, प्रवीण राऊत यांनी 55 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नीच्या बँक खात्यात ट्रान्सफर केल्याचेही समोर आले आहे. या पैशांचा स्त्रोत काय, याचा शोधही ईडी घेत आहे. या संपूर्ण घोटाळ्यात संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे ई़डीचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...