आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sanjay Raut Meeting Sharad Pawar Y.b Chavhan Center | Now Is Our Time; We Will Not Give Up, The Mavia Government Will Complete Two And A Half Years

संजय राऊतांचे शिंदेंना चॅलेंज:म्हणाले- आता आमची वेळ; आम्ही हार मानणार नाही, मविआ सरकार अडीच वर्षे पूर्ण करणार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कायदेशीर मार्गच नाही तर आम्ही सर्वच प्रकारचे मार्ग आम्ही अवलंबू, यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन सांगतो की, आम्ही हार मानणार नाही, आम्ही नक्कीच जिंकू, लढाई रस्त्यावर झाली तरी त्यातदेखील आम्हीच जिंकू, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांची आज मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली, त्यात ते माध्यमांशी बोलत होते.

आता वेळ गेली

पुढे ते म्हणाले की, ज्यांना आमच्याशी सामना करायचा आहे त्यांनी मुंबईत यावे, शिंदे गटाने अतिशय चुकीचा निर्णय घेतला आहे. त्यांना आता आम्हाला सामोरे जावे लागेल. आम्ही शिंदे गटाला मुंबई परत येण्यासाठी वेळदेखील दिला होता. मात्र, आता ती वेळ गेली आहे.

शिंदेना चॅलेंज

आम्ही आता पूर्ण तयारीने आहोत, तुम्ही आता मुंबईत या, असे खुले आव्हानही यावेळी राऊतांना शिंदे गटाला दिले आहे. पुढे ते म्हणाले की, वाय. बी. चव्हाण या इमारतीतून महायुतीची घोषणा झाली होती. आज पुन्हा याच इमारतीच्या आवारातून सांगतोय की, महाविकास आघाडी मजबूत आहे, महाविकास आघाडी सरकार उरलेले अडीच वर्षेदेखील पूर्ण करणार आणि पुन्हा सत्तेतदेखील येणार. आम्हाला जे करायचे होते ते आम्ही आता केलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...