आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sanjay Raut New Statment For Anvay Naik Suicide Case | MP Sanjay Raut's New Sensational Allegations Against Kirit Somaiya; BJP Is Responsible For Naik's Suicide | Marathi News

राऊत Vs सोमय्या:खासदार संजय राऊत यांचा किरीट सोमय्यांवर नवीन खळबळजनक आरोप; अन्वय नाईकच्या आत्महत्येला भाजप जबाबदार- राऊत

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. किरीट सोमय्यांनी ठाकरे घराण्यावर वनविभागाच्या जमीनीवर 19 बंगले बांधण्याचा आरोप केला आहे. तसेच संजय राऊत यांनी देखील कोरोना काळात कोव्हिड सेंटरमध्ये भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप सोमय्या वारंवार करत आहे. दरम्यान आज संजय राऊत यांनी पुन्हा किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी अन्वय नाईक यांच्या आत्महत्येसाठी भाजपला जबाबदार ठरवले आहे.

संजय राऊत म्हणाले की, अन्वय नाईक यांना आत्महत्या का करावी लागली. याच्यावर हे लोक काही बोलत नाहीत. त्यावर भाजपच्या लोकांनी बोलले पाहिजे. भाजपच्या दबावामुळे नाईक यांनी आत्महत्या केली. या किरीट सोमय्यांनी अन्वय नाईक यांना दोन वेळा धमकी दिली, असा नवा गंभीर आरोप करून राऊत यांनी खळबळ उडवून दिली. सोमय्या पिता-पुत्र दोघेही लवकरच जेलमध्ये जाणार असा दावा पुन्हा राऊत यांनी केला आहे.

अन्वय नाईक प्रकरण काय आहे?
5 मे 2018 रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली होती. तिथेच त्यांच्या आई कुमूद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता. अन्वय नाईक हे पेशाने वास्तुविशारद होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे ते व्यवस्थापकीय संचालक होते. अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आणि त्यांना आत्महत्येला जबाबदार धरले होते. त्यानंतर अन्वय नाईक यांच्या पत्नीने अलिबाग पोलिस ठाण्यात अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. अन्वय नाईक यांच्या कंपनीने अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ उभारला होता. याच कामाचे अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्याने अन्वय नाईक यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा आरोप अक्षता नाईक यांनी केला होता.

बातम्या आणखी आहेत...