आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनता लंफग्यांना रस्त्यावर मारेल:मुश्रीफांवरील कारवाईवरुन संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले- सर्वांचा हिशोब होईल

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जो कुणी सरकारविरोधात बोलत आहे, सरकारविरोधात आवाज उठवत, त्याच्यावर ईडीची धाड टाकली जात आहे. हसन मुश्रीफ यांच्यावरील कारवाई, यामधीलच एक प्रकार आहे. मात्र सत्तेचा गैरवापर करणाऱ्या लंफग्यांना जनता एक दिवस रस्त्यावर पकडून मारेल, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.

जनता आमच्यासोबत

सजंय राऊत म्हणाले, हसन मुश्रीफ हे सहकार क्षेत्रातील महत्त्वाचे नाव आहे. कोल्हापुरातील ते एक महत्त्वाचे नेतृत्व आहेत. काल ठाकरे गटाच्या सदानंद कदम यांनी ईडीने अटक केली. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली. जो कुणी सरकारविरोधात आवाज उठवतोय, त्याच्यावर कारवाई केली जात आहे. मात्र, काहीही झाले तरी आम्ही गुडघे टेकणार नाही. कारण जनता आमच्यासोबत आहे.

2024मध्ये हिशोब होईल

संजय राऊत म्हणाले, सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीही आलेले नाही. सत्ता येते, सत्ता जाते. आज जो सत्तेचा प्रचंड गैरवापर होत आहे, तो जनतेला आवडलेला नाही. 2024 च्या निवडणुकीत जनता कोणासोबत आहे, हे दिसेल. तेव्हा सर्वांचा हिशोब होईल. सत्तेचा प्रचंड गैरवापर करणाऱ्या लंफग्यांना जनता रस्त्यावर पकडून मारेल. लिबिया, इराक, इराण येथे हुकुमशाही वृत्तीच्या लोकांना जनतेने रस्त्यावर पकडून मारले. तसे चित्र भारतात दिसेल.

उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे धडकी

सदानंद कदम यांना अटक करण्याचे कारण काय?, असा सवाल करत संजय राऊत म्हणाले, सदानंद कदम यांना अटक केली, अशी माहिती ईडीने देण्यापूर्वीच मुलुंडचे पोपटलाल अटक केली, अटक केली, असे बोंबलत होते. जो रिसॉर्ट अजून सुरूही झालेला नाही, त्यातून प्रदूषित पाणी बाहेर निघत असल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली. हा ईडीचा विषय आहे. उद्धव ठाकरेंची खेडमधील सभा यशस्वी करण्यामागे सदानंद कदम यांची मेहनत आहे. या एकाच कारणासाठी खेडमध्ये जाऊन त्यांना ईडीने अटक केली. कारवाईमागे दुसरे कोणतेही कारण नाही.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचा आरोप:हसन मुश्रीफ यांना काहीही करुन अडकवायचे हा सत्ताधाऱ्यांचा अजेंडा, ईडीची धाड धक्कादायक

विक्रांत घोटाळ्याचे काय झाले?

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात हे चाललय काय? लालूप्रसाद यादव नुकतेच गंभीर आजारातून बरे झालेत. त्यांची गर्भवती सून आहे. त्यांच्यावर धाडीमागून धाडी पडत आहेत. महाराष्ट्रातही तेच सुरू आहे. भाजप नेत्यांनी विक्रांत घोटाळा केला. मात्र, त्यांना क्लिन चीट दिली. बँका बुडवणारे लोक भाजपात आहे. मात्र, कारवाई आमच्यावर केली जात आहे. मी भविष्यात भाजप नेत्यांनी ज्या कारखान्यात घोटाळा केला, अशा कारखान्यांची यादी ईडीला पाठवणार आहे. ईडी त्यांची चौकशी करणार का?

नवाब मलिकही सुटतील

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात मविआ गतीने पुढे जात आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या निकालाने हे स्पष्ट केले आहे. या गतीला खीळ घालण्यासाठी ईडीचा कारवाया सुरू आहेत. मात्र, या सर्व कारवाया बोगस आहेत. अनिल देशमुख व माझ्या प्रकरणातही हे स्पष्ट झाले आहे. कोर्टाने ईडीवर ताशेरे ओढले आहेत. नवाब मलिक, हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा हा भंपकपणाचा बुरखाही लवकरच फाटेल.

संबंधित वृत्त

हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड:राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भाजपविरोधात घोषणाबाजी, घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा एकदा ईडीची धाड पडली आहे. आज पहाटेच ईडीच्या 4 ते 5 अधिकाऱ्यांनी कागलमधील हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली आहे. संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळाप्रकरणी मुश्रीफ यांच्या घराची ईडीकडून झाडाझडती घेतली जात आहे. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...